vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातून चारा वाहतूक व विक्रीवर बंदी-श्रीवर्धन तालुक्यात ट्रिगर-१ व ट्रिगर-२ नुसार दुष्काळ जाहीर; जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश

जिल्ह्यातून चारा वाहतूक व विक्रीवर बंदी-श्रीवर्धन तालुक्यात ट्रिगर-१ व ट्रिगर-२ नुसार दुष्काळ जाहीर; जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२६ मध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) व ‘ट्रिगर-२’ नुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा आणि संभाव्य चारा टंचाई टाळता यावी, यासाठी रायगड जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून इतर जिल्ह्यांत तसेच राज्याबाहेर सर्व प्रकारच्या ओल्या व सुक्या चाऱ्याची वाहतूक व विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश जारी केले आहेत.

जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, रायगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा मोठ्या प्रमाणावर इतर जिल्ह्यांत विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच चारा उपलब्धतेवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.

या आदेशानुसार, जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर कडबा, कुट्टी, पेंढा यांसह सर्व प्रकारच्या ओल्या व सुक्या चाऱ्याची वाहतूक आणि विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत मंजुरी मिळालेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

सदर आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार असून, त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि संभाव्य चारा टंचाईवर नियंत्रण ठेवणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.

000

संबंधित पोस्ट

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2026 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धा;प्रवेशिका मागविल्या

vishwatmaklokswamivarta

पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

जिल्हा परिषदेत मानवी रांगोळीद्वारे ‘सेवा संकल्प अभियान’ ची सुरुवात

vishwatmaklokswamivarta

साताऱ्यात उत्साहात पार पडली ‘समता दिंडी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वयाने काम करा- मंत्री अतुल सावे यशदामध्ये महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

vishwatmaklokswamivarta