vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेश

श्रीवर्धन तालुक्यात सप्टेंबर महिन्यासाठी धान्याचे नियतन मंजूर अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना गहू आणि तांदळाचे वितरण

श्रीवर्धन तालुक्यात सप्टेंबर महिन्यासाठी धान्याचे नियतन मंजूर अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना गहू आणि तांदळाचे वितरण

रायगड-अलिबाग, द प्रतिनिधी :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत श्रीवर्धन तालुक्यासाठी सप्टेंबर २०२६ महिन्याचे धान्य नियतन मंजूर करण्यात आले आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत एकूण ३,७४९.८० क्विंटल गहू व तांदळाचे नियतन मंजूर करण्यात आले असल्याची माहिती सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी स्वप्नील पडोळे यांनी दिली आहे.अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत २ हजार २४० शिधापत्रिकांसाठी ३३६ क्विंटल गहू आणि ४४८ क्विंटल तांदूळ, असे एकूण ७८४ क्विंटल धान्य मंजूर करण्यात आले आहे

तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेअंतर्गत ५९ हजार ३१६ लाभार्थ्यांसाठी १ हजार १८६.३२ क्विंटल गहू आणि १ हजार ७७९.४८ क्विंटल तांदूळ असे एकूण २ हजार ९६५.८० क्विंटल धान्य मंजूर करण्यात आले आहे

अंत्योदय अन्न योजनेतील प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला १५ किलो गहू व २० किलो तांदूळ, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला २ किलो गहू व ३ किलो तांदूळ वितरित करण्याचे नियोजन आहे. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित रास्तभाव धान्य दुकानातून निर्धारित प्रमाणात धान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. पडोळे यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सदनात ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग निर्मिती’चा अनोखा उत्सव,फाईन लाईन आर्ट अकॅडमी’चा उपक्रम; कलाकुसर पाहून दिल्लीकर स्तिमित..

vishwatmaklokswamivarta

राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.ओला,उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने लातूर येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मार्गदर्शन

गोंदिया जिल्ह्यातील कृषी विकासाच्या सर्व प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

महाविकास आघाडीला मोठा धक्का! माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश 

पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे· पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; उत्कृष्ट कार्यप्रणाली पुरस्काराने सन्मान..