vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या 1183 ग्रंथांची यादी प्रसिद्ध31 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना पाठवण्याचे आवाहन

ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या 1183 ग्रंथांची यादी प्रसिद्ध31 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना पाठवण्याचे आवाहन

            सांगली, प्रतिनिधी: राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 51 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत सन 2024 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथापैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या 1183 ग्रंथांची यादी (मराठी 685, हिंदी 246, इंग्रजी 252) जाहीर केली आहे. ही यादी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे. कोणत्याही ग्रंथाबाबतच्या हरकती व सूचना असल्यास 31 ऑक्टोबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

   प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, ग्रंथ यादीतील ग्रंथ संचालनालयाच्या 25 टक्के ग्रंथसूटदरानुसार वितरित करणे बंधनकारक आहे. या ग्रंथयादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत काही सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई – 400001 यांच्याकडे लेखी स्वरूपात कार्यालयीन वेळेत हस्तबटावडीने, किंवा पोस्टाने अथवा संचालनालयाच्या director.dol@maharashtra.gov.in या ई-मेलवर पाठवाव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचना, हरकती किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

     यादीतील ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास स्वागतार्ह असेल, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समितीनिवडणूक-2026 मतदानाच्या दिवशी आठवडा बाजारांना पूर्णवेळ बंदी..

vishwatmaklokswamivarta

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी व्हा -अंबिया बहार २०२६-२७ साठी आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी व संत्रा पिकांचा समावेश

राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.ओला,उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर शहीदी समागमसाठी२५० जणांची संगत नांदेड कडे रवाना…

vishwatmaklokswamivarta

इंडिया एअरक्राफ्ट लीजिंग अँड फायनान्सिंग’ विषयावर शिखर परिषद 2.0

जम्मू-काश्मीरमधील वार्षिक श्री अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे सलग सहा दिवस स्थगित राहिल्यानंतर आज पुन्हा सुरू …