vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

एका कॉलवर बालकाला मिळाला आधार !चाईल्ड हेल्पलाइन १०९८ च्या तत्परतेमुळे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बालकाची बालगृहात सुरक्षित रवानगी

एका कॉलवर बालकाला मिळाला आधार !चाईल्ड हेल्पलाइन १०९८ च्या तत्परतेमुळे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बालकाची बालगृहात सुरक्षित रवानगी

सातारा प्रतिनिधी- जिल्हा महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या चाईल्ड हेल्पलाइन कक्ष 1098 च्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर आढळलेल्या एका बालकाला मदतीचा हात देण्यात आला. दिनांक 24 ऑक्टोबर 2026 रोजी चाईल्ड हेल्पलाइन 1098 वर प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधित लोहमार्ग पोलिस अधिकारी व चाईल्ड हेल्प लाईन चे अधिकारी कर्मचारी यांनी तत्परतेने कार्यवाही केली.

सातारा रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बालकाची सुरक्षितता व काळजी लक्षात घेऊन आवश्यक ती कार्यवाही बाल कल्याण समिती, सातारा यांच्या आदेशान्वये करण्यात आली. त्यानंतरे बालकाला पुढील देखभाल, संरक्षण व पुनर्वसनासाठी बालगृहात दाखल करण्यात आले. अडचणीत सापडलेल्या बालकांना मदत, संरक्षण आणि सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाइन 1098 महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. संकटात सापडलेल्या बालकांना वेळीच मदत मिळावी, यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून बालकांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, व तसेच अशा प्रकारची बालके कोठेही आढळून आल्यास तातडीने 1098 चाईल्ड हेल्पलाइन कक्षास संपर्क करण्याचे अवाहन असे जिल्हा महिला व वाल विकास अधिकारी ज्योती लंगुटे यांनी केले.

000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; २६९६ कोटी रुपयांच्या तूर खरेदीला केंद्राची मंजुरी

vishwatmaklokswamivarta

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” 2026 अतंर्गत आयोजीत रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जालना येथे 29 सप्टेंबरला रोजगार महाकुंभ; युवकांना रोजगाराच्या संधी…

vishwatmaklokswamivarta

📢 लातूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणार· ८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार, पंधरा हजार कोटींच्या कर्जास मान्यता…

vishwatmaklokswamivarta

कामगार भवनात कामगारांसाठींच्या सेवा एकाच छताखाली – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर कामगार भवनचे भूमिपूजन