शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार – मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे शहरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 600 जनरल बेड हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
शेंडा पार्क येथे उभारण्यात येत असलेल्या 600 जनरल बेड,250 कॅन्सर व 250 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामासह सांगाव येथील आयुर्वेदिक / होमिओपॅथिक , उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार तसेच CPR रुग्णालयाती प्रलंबित कामकाजाचा आढावा श्री मुश्रीफ यांनी आज घेतला.
यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड,उप अधीक्षक डॉ.गिरीष कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, या ठिकाणी सुरू असलेली बांधकामे 31 मार्च पर्यं