शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजारांची अग्रिम मदत जमा होण्यास सुरुवात*
जालना, प्रतिनिधी : राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी महत्वपुर्ण निर्णय घेतला असून, त्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जालना जिल्हा प्रशासनाने अशा शेतकऱ्यांची यादी अपलोड केली आहे, ज्यांना थेट डीबीटी (DBT) द्वारे 5 हजार रुपयांची आगाऊ रक्कम दिली जाणार आहे. राज्य शासनाने आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात केली आहे.
यात जिल्ह्यातील जालना तालुक्यातील 91 हजार 226 शेतकरी तर बदनापुर तालुक्यातील 64 हजार 678, भोकरदन तालुक्यातील 1 लाख 33 हजार 899, जाफ्राबाद तालुक्यातील 70 हजार 635, परतुर तालुक्यातील 51 हजार 226, मंठा तालुक्यातील 64 हजार 888, अंबड तालुक्यातील 91 हजार 200 आणि घनसावंगी तालुक्यातील 77 हजार 205 असे जिल्ह्यातील एकुण 6 लाख 44 हजार 957 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली आहे.
दिवाळीच्या सणापूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुष्काळामुळे शेतीचे झालेले नुकसान आणि आर्थिक अडचणींना तोंड देत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही 5 हजार रुपयांची अग्रिम मदत राज्य शासनाकडून तातडीने दिली जात आहे. या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हातभार लागणार आहे. जिल्ह्यात या अग्रिम मदतीची अंमलबजावणी वेगाने सुरू झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली आहे.