vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

बुलढाणा येथे आयोजित होणार राज्यस्तर शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा.

बुलढाणा येथे आयोजित होणार राज्यस्तर शालेय हॉकी क्रीडा स्पर्धा.

 

     खेळ प्रतिनिधी  – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र हॉकी व बुलढाणा हॉकी असोसिएशन यांचे तांत्रिक सहकार्याने दि. 12 ते 16 नोव्हेंबर 2026 रोजी, सहकार विद्यामंदिर, बुलढाणा येथे राज्यस्तर शालेय हॉकी (14,17 वर्षाआतील मुले, मुली) क्रीडा स्पर्धाचे आयोजन होत आहे. सदर क्रीडा स्पर्धांकरीता महाराष्ट्र राज्यातील एकुण 10 विभागातून हॉकी करीता प्रत्येकी 18 मुले व 18 मुली, पुरुष व महिलाच्या संघा सोबत प्रति संघ 01 व्यवस्थापक तसेच तज्ञ पंचाधिकारी, स्वयंसेवक, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी इत्यादीची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उपस्थिती लागणार आहे.

     या क्रीडा स्पर्धेचा उदघाटन समारंभ दि. 12 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5.30 वा. सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे होणार आहे. यावेळी सन्माननिय मान्यवर, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे मा. अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषदेचे सर्व सन्माननिय मान्यवर, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, मा.उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग, अमरावती, हॉकी संघटनेचे मा. पदाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच क्रीडा प्रेमी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. क्रीडा स्पर्धाचे यशस्वी आयोजना करीता सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे मुले व मुलींच्या निवासाची व्यवस्था सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे करण्यात आली आहे. तसेच मुलांची निवास व्यवस्था नुतन विद्यालय, मलकापूर जि. बुलढाणा येथे करण्यात आली आहे. स्पर्धा ठिकाण ते निवास व्यवस्था पर्यंत खेळाडुंना ने-आण करण्यासाठी यशोधाम पब्लिक स्कुल, यांचे मार्फत स्कुल बसचे नियोजन करण्यात आलेले आहे. भोजन व्यवस्था स्पर्धा ठिकाण करण्यात येणार आहे. या स्पर्धेकरीता जनता कला व वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे बॅडमिंटनचे 4 अद्यावत कोर्ट तयार आहेत. तसेच तालुका क्रीडा संकुल,मलकापूर येथे सॉफ्ट टेनिस चे एक अद्यावत कोर्ट तयार आहे. या क्रीडा स्पर्धांचे आयोजन उत्कृष्ठ होण्याचे अनुषंगाने दि. 14 ऑक्टोंबर 2026 रोजी दुपारी 1.00 वा. मा. निवासी उपजिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे अध्यक्षते खाली जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये वरील दोन्ही राज्यस्तर क्रीडा स्पर्धा आयोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जनता कला व वाणिज्य महाविद्यलय, मलकापूर शारिरीक शिक्षण संचालक प्रा. डॉ. कैलास पवार तर यशोधाम पब्लिक स्कुल, मलकापूर, प्राचार्या उपस्थित होत्या. तसेच बॅडमिंटन व सॉफ्ट टेनिस एकविध खेळ संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजनाचे अनुषंगाने स्पर्धा आयोजन समिती, तक्रार निवारण समिती, उद्घाटक समिती,तांत्रिक समिती,मैदान व्यवस्था, भोजन, निवास,वैद्यकीय समिती, प्रसिध्दी समिती व स्वच्छता समिती इत्यादी विवधि समित्यांचे गठण करण्यात आले असून निमंत्रण पत्रिका, प्रमाणपत्र, भोजन पासेस, तथा दस्ताऐवजाबाबतचे कामकाज सुध्दा अतिम टप्प्यात आहे. दि. 23 ते 25 ऑक्टोंबर 2026 या कालावधीत राज्यस्तर शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा असल्यामुळे सैन्यभरती, पोलिस भरती सरावाकरीता तालुका क्रीडा संकुल, मलकापूर जि. बुलढाणा येथील मैदान बंद ठेवण्यात आले आहे. याची संबंधीतांनी नोंद घ्यायची आहे.

       सदर क्रीडा स्पर्धा यशस्वी आयोनाचे अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मा. जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मेहनत घेत आहे. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जिल्हयातील बहुसंख्य क्रीडा प्रेमीनी उपस्थित रहावे. तसेच स्थानिक शाळेतील विद्यार्थांनी सुध्दा या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी नियोजन करावे.व इच्छुक खेळाडुंना क्रीडा स्पर्धे दरम्यान मैदानावर पाठविण्याचे आवाहन मा.जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा श्रीमती भक्ती आंब्रे यांनी केले आहे.

District Sports Officer,BuldanaDistrict Sports Complex, KridanagariJambharun Road, Buldana-443001

00000

संबंधित पोस्ट

क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबिरातून घडतील उत्कृष्ट खेळाडू-कारागृह अधीक्षक मेघा बाहेकर,बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुलात उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ

मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांमध्ये #क्रीडा विषयक आवड निर्माण करून त्यांना सक्षम खेळाडू घडविण्याच्या  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, अथलेटिक्स तसेच फिटनेस प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

मुंबईत फिट इंडिया – संडेज ऑन सायकल उपक्रमाची 75 वी आवृत्ती साजरी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 च्या भारतातील आयोजन

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर

बुलडाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन

राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी जालन्याचे १५ कराटेपटू दिल्लीला रवाना; सेन्साई रूपेंद्र पारचा यांच्याकडे महाराष्ट्र संघाचे टीम मॅनेजरपद तालकटोरा इंटरनॅशनल स्टेडियमवर २३ व २४ जुलैला होणार राष्ट्रीय स्पर्धा; जालन्याच्या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा…