vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया : कागदपत्र पडताळणी व प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया : कागदपत्र पडताळणी व प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे): बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE) अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेत सोडतद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणी व प्रवेश निश्चित करण्यासाठी दि. ३० एप्रिल, २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

या प्रक्रियेस प्रतिसाद देणाऱ्या पालकांच्या सोयीचा विचार करून तसेच सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी दि. ०१ मे २०२६ ते दि. ०८ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, दिलेल्या कालावधीत पालकांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित शाळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे की, या कालावधीनंतर कोणतीही पुढील मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे सोडत यादीत नाव असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी विलंब न करता तत्काळ आवश्यक कार्यवाही करावी.

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे, अर्जाची माहिती व संबंधित शाळांची माहिती अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असून, पालकांनी ती तपासून नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

“आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव प्रवेश ही वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची संधी आहे. कोणताही पात्र विद्यार्थी केवळ कागदपत्र पडताळणी न झाल्यामुळे वंचित राहू नये, यासाठी ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांनी दिलेल्या कालावधीत सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून घ्यावा. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही,” असे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी स्पष्ट केले.

000

संबंधित पोस्ट

जालना शहरातील राजपूतवाडी येथील जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येण्यामागील कारण स्पष्ट• नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

शेतकऱ्यांना चारा बियाणांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

हवामान बदलाच्या परिस्थितीत शिवार फेरी चे माध्यमातून शाश्वत शेती तंत्रज्ञान जाणून घ्या कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बेलापूर, सानपाडा आणि तुर्भे येथील व्यावसायिक मालमत्ता जप्त-नवी मुंबई महापालिकेच्या जप्ती पथकाकडून थकीत मालमत्ताधारकांवर कठोर कारवाई

vishwatmaklokswamivarta

इतर मागास वर्ग, विमुक्‍त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा..

सकाळ माध्यम समूहातर्फे पुणे विभागीय ॲग्रोवन सरपंच महापरिषद शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा– कृषी मंत्री दत्तात्रय भरणे