vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी करा- विभागीय आयुक्त शीतल तेली*

*नाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी करा- विभागीय आयुक्त शीतल तेली*

पुणे, प्रतिनिधी : जादूटोणा अंतर्गत गुन्ह्यांची संख्या कमी होत आहे, ही सकारात्मक बाब आहे. जुन्या चालीरिती, रुढी- परंपरा बदलणे हे कठीण काम आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे राबवून प्रचार, प्रसिद्धी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिल्या.जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी गठीत विभागीय समितीच्या आढावा बैठकीत श्रीमती तेली बोलत होत्या. यावेळी समितीच्या सदस्य सचिव तथा समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, पुणे जिल्ह्याचे सहायक आयुक्त विशाल लोंढे तसेच विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

श्रीमती तेली म्हणाल्या, या कायद्याची विविध स्पर्धांमधून जनजागृती करता येईल. विद्यार्थी हे संदेशवहनाचे काम चांगल्या प्रकारे करु शकतात, त्यामुळे शाळांमध्ये विशेषत: आदिवासी भागातील शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करावेत. विविध भागांमधील गुन्ह्यांची मिमांसा करुन सेवाभावी संस्था, बिगर शासकीय संस्थांना सामील करुन घ्यावे. नियमानुसार जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात यावे. या कायद्याशी संबंधित सर्व घटकांनी एकत्रितरित्या काम केल्यास कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकेल. सर्व जिल्ह्यांनी प्राप्त निधीचा खर्च प्रचार- प्रसिद्धीच्या कामासाठी करावा, असे त्यांनी सांगितले.

बैठकीत या कायद्यांतर्गत दाखल प्रकरणे, उपलब्ध अनुदान, गुन्हयांची संख्या आदी विषयांचा विभागीय आढावा घेण्यात आला. 000

संबंधित पोस्ट

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान३० जून रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे हौशी मराठी नाट्य, बालनाट्य व प्रथम मराठी एकांकिका स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांचा गौरव

नियतकालीक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वर्षिक सर्वेक्षण (ASUSE) 2026 करीता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे प्रगणकांना अचूक माहिती देणेचे आवाहन

दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची भेट… दिवंगत पुरण कुमार यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

vishwatmaklokswamivarta

ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊ -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणार   

राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयोजन; ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ ही संकल्पना

vishwatmaklokswamivarta