vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्गनगरीतील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण

सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी): सिंधुदुर्गनगरी येथे प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या उभारणीसंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या वतीने प्रस्तावित शिवस्मारकाचा संकल्पनात्मक आराखडा सादर करण्यात आला.

यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधीक्षक अभियंता दिनेश कुमार बागुल , जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक विजय सकपाळ उपस्थित होते. बैठकीत प्रस्तावित शिवस्मारकाची रचना, पुतळ्याचे स्वरूप, परिसर विकास, तांत्रिक बाबी तसेच पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री श्री. राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या विविध बाबींचा आढावा घेतला.

यावेळी पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक हे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन वैभवात भर घालणारे ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची उभारणी विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून कार्यवाहीला गती द्यावी असे निर्देश त्यांनी दिले.

००००००

 

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ संपन्न ग्रामस्थांच्या सहभागाने सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबवावे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम

श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती व #राष्ट्रीययुवादिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे शहर सर्वंकष गतीशीलता’ योजनेचे सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

निरखेडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाला भेट देत 6 हजारहून अधिक नागरिकांनी केले वैचारिक अभिवादन.चैत्यभूमी येथेही ज्ञानस्मारकाची माहिती देणारा स्टॉलचैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रमाची ज्ञानस्मारकात थेट प्रक्षेपण व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta