vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी मोफत पोलीस – सैन्यदल भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण

अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी मोफत पोलीस – सैन्यदल भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण

 

  अहिल्यानगर, प्रतिनिधी-जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुलींसाठी दि. १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत चार महिन्यांच्या मोफत निवासी व भोजन व्यवस्थेसह असणाऱ्या या भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन ‘पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी, ता. अकोले’ येथे करण्यात आले आहे. इच्छुकांनी २६ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे.

 प्रशिक्षणासाठी उमेदवार किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय १८ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे. वजन किमान ५० कि.ग्रॅ. तसेच उंची किमान १६५ से.मी. असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांमध्ये इ. १२ वीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला किंवा शिधापत्रिका, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) तसेच चार पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सादर करणे बंधनकारक आहे.

  निवड प्रक्रिया शारीरिक क्षमता चाचणी व लेखी परीक्षेद्वारे होणार असून १६०० मीटर धावण्याची चाचणी (५० गुण) व लेखी परीक्षा (५० गुण) अशा एकूण १०० गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. उमेदवारांची निवड गुणवत्ता क्रमांकानुसार करण्यात येणार आहे.

  इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक ९ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत ऑफलाईन अर्ज भरून पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, मवेशी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज केलेल्या उमेदवारांनी दिनांक २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता मूळ कागदपत्रांसह आणि त्यांच्या छायांकित प्रतींसह परीक्षेसाठी प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९४२१५२५४१६, ८२७५३४९४१४ किंवा ९९६०११२६०० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

 

#भरतीपूर्वप्रशिक्षण #PreRecruitmentTraining #अहिल्यानगर #Ahilyanagar #महिलासक्षमीकरण #WomenEmpowerment

संबंधित पोस्ट

महिला सुरक्षा व न्यायासाठी महिला काँग्रेसचा जालना शहरात मूक मोर्चा गांधी चमनवर निषेधाची शांत आंदोलनात्मक भूमिका..

महाबळेश्वर तहसील कार्यालयात महिला दिनानिमित्त शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात* 

जिल्हा दक्षता समिती बैठकसंविधान जाणीवजागृती उपक्रमांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जमिनीचे हस्तांतरण

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन२० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक…

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीकडून व्यापक जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta