
लोणंद येथे पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शनास वारकऱ्यांचा प्रतिसाद
सातारा प्रतिनिधी-
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत ‘संवाद वारी’ या शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची, उपक्रमांची माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे, एलईडी व्हॅन, कलापथक व्हॅन तसेच चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोणंद येथे या उपक्रमाचे सांगोला येथून आलेल्या वारकरी दिंडीचे प्रमुख बिरा बंडगर महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माहिती उपसंचालक किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आदी उपस्थित होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हे प्रदर्शन मांडणी करण्यात येत असून मुक्काम तळांसोबत संपूर्ण मार्गावर चित्ररथ, कलापथक तसेच एलइडी व्हॅनच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती करण्यात येत आहे.



