vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कारागृहातील बंदीवानांसाठी ‘सहाय्यक योग प्रशिक्षक’ कौशल्य प्रशिक्षणास प्रारंभ

कारागृहातील बंदीवानांसाठी ‘सहाय्यक योग प्रशिक्षक’ कौशल्य प्रशिक्षणास प्रारंभ

अहिल्यानगर, प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कारागृहात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जन शिक्षण संस्था, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहाय्यक योग प्रशिक्षक’ या कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या नवीन तुकडीस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश उगले, जिल्हा कारागृह अधीक्षक संतोष कवार, जन शिक्षण संस्थेचे संचालक अनिल तांदळे आणि कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद उपस्थित होते.

 

सहाय्यक आयुक्त योगेश उगले यांनी बंदीवानांच्या पुनर्वसन व स्वावलंबनासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण महत्त्वाचे असून अधिकाधिक बंदीवानांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कारागृह अधीक्षक संतोष कवार यांनी मागील तुकडीतील प्रशिक्षणामुळे बंदीवानांना झालेल्या फायद्यांची माहिती देत भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात परतल्यावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शफाकत सय्यद यांनी केले तर अनिल तांदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने लातूर तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी निवडणूक संबंधित नोडल अधिकारी यांची बैठक

vishwatmaklokswamivarta

आज रविवार, २० जुलै रोजी मुंबईतील मध्य व हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक…

vishwatmaklokswamivarta

आयुष्यमान भारत, हात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाड क्रांतीभुमीत भिमसृष्टी उभारण्यात यावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  *चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापनदिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना चवदार तळे येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले विनम्र अभिवादन* 

महाराष्ट्र भूषण राम सुतार श्रद्धांजली सभेचे उद्या दिल्लीत आयोजन

vishwatmaklokswamivarta

व्यसन दुष्परिणामाबाबत प्रत्येक शाळेत20 फेब्रुवारी, 11 मार्चला परिपाठ – जिल्हाधिकारी अशोक काकडे- व्यसन दुष्परिणाम परिपाठामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा- व्यसनमुक्तीसाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन- तंबाखूजन्य व प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी दक्ष राहा…

vishwatmaklokswamivarta