vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

विविध नागरी सुविधा प्रकल्पांची वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी केली महापौर व पदाधिका-यांसमवेत पाहणी..

विविध नागरी सुविधा प्रकल्पांची वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी केली महापौर व पदाधिका-यांसमवेत पाहणी..

 

     नवी मुंबई  प्रतिनिधी     नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत ऐरोली सेक्टर 5 येथे उभारण्यात येत असलेले नुतन नाट्यगृह, सेक्टर 10 ए येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह स्मारक त्याचप्रमाणे एमएमआरडीएमार्फत काम सुरू असलेला ऐरोली काटई भुयारी मार्ग आणि सिडकोमार्फत काम सुरू असलेला खारघर तुर्भे भुयारी मार्ग या प्रकल्पांची पाहणी करीत यामुळे नवी मुंबईच्या विकासात लक्षणीय भर पडेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी व्यक्त केला. महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी सूचित केल्यानुसार, आज विविध लोकोपयोगी प्रकल्पांच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यात आली व या कामांना वेग देऊन तसेच कामाचा दर्जा राखून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे सूचित करण्यात आले.

          याप्रसंगी वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्यासमवेत महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील तसेच विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक आणि शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड व एमएमआरडीए, सिडको व महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई, ठळक अक्षरात ‘मराठी नामफलक’राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते  शोरुमचं उद्घाटन झाले

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..

नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता,भविष्यात रस्ता बनविताना परिसरात विकासाची ‘इकोसिस्टीम’ निर्माण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एस टी महामंडळाची NCMC स्मार्ट कार्ड सेवा-सवलतधारी प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती

पर्यावरणाच्या हितासाठी पीएनजी जोडणीस प्राधान्य द्यावे**जिल्हाधिकारी संतोष पाटील*

महापुरुषांविषयी अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल सोलापुरकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार कारवाई करा चंद्रकांत रत्नपारखे यांची मागणी

vishwatmaklokswamivarta