vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

डाक जीवन विमा विस्तारासाठी इतर विभागीय कर्मचाऱ्यांची एजंट श्रेणी सुरु

डाक जीवन विमा विस्तारासाठी इतर विभागीय कर्मचाऱ्यांची एजंट श्रेणी सुरु

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– केंद्र व राज्य शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये डाक जीवन विमा तसेच ग्रामीण डाक जीवन विमा यांचा प्रसार आणि व्याप्ती वाढविण्यासाठी डाक विभागाने ‘इतर विभागीय कर्मचारी ही नवीन एजंट श्रेणी दि. १ जुलै पासून सुरु केली आहे

या योजनेत डाक विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त वेतन मेट्रिक्समधील लेव्हल-८ पर्यंतच्या पदावर कार्यरत केंद्र अथवा राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना इतर विभागीय कर्मचारी एजंट म्हणून नोंदणी करता येणार आहे. हे काम करणे पूर्णतः ऐच्छिक असून, यामुळे संबंधित कर्मचारी आणि डाक विभाग यांच्यात कोणत्याही प्रकारचे नियोक्ता-कर्मचारी संबंध निर्माण होणार नाहीत.अशा कर्मचाऱ्यांना विमा व्यवसाय मिळविण्याचे काम त्यांच्या नियमित शासकीय कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त करावे लागेल. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने आपल्या मूळ विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) अथवा आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, परिचयात्मक माहिती, प्रशिक्षण तसेच कामकाजासाठी आवश्यक सहाय्य विकास अधिकाऱ्यांकडून उपलब्ध करून दिले जाईल. हा विमा व्यवसाय प्राप्त करणे तसेच पॉलिसी नूतनीकरणासाठी प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार आहे. पॉलिसीच्या प्रकारानुसार व प्रीमियम भरण्याच्या कालावधीनुसार प्रथम वर्षाच्या प्रीमियमवर ४ ते २० टक्क्यांपर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे. ग्रामिण डाक जीवन विम्याच्या सर्व प्रकारच्या पॉलिसींवर प्रथम वर्षाच्या व्यवसाय प्राप्ती प्रीमियमच्या १० टक्के प्रोत्साहन दिले जाईल. दुसऱ्या वर्षापासूनच्या नूतनीकरणासाठी १ ते २.५ टक्के प्रोत्साहन देण्यात येईल. इतर विभागीय कर्मचारी एजंट म्हणून कार्यरत असताना मिळविलेल्या विमा व्यवसायावर संबंधित कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतरही नूतनीकरण प्रोत्साहन मिळविता येणार आहे. त्यासाठी सेवानिवृत्तीच्या तीन महिन्यांच्या आत फील्ड ऑफिसर म्हणून नोंदणी करणे आवश्यक राहील

अर्ज करण्याचे आवाहन,पात्र व इच्छुक शासकीय कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत कार्यालयीन ओळखपत्राची साक्षांकित प्रत, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा तसेच मूळ विभागाकडून प्राप्त ना-हरकत प्रमाणपत्र जोडून प्रवर अधीक्षक डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर-४३१००१ यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावा.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी संदीप महाजन, मोबाईल क्र. ८४८४९५४८०८ यांच्याशी संपर्क साधावा, असे डाक विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

मंत्री मंगलप्रभात लोढा यांची अभिनव संकल्पना : उद्योजकासाठी प्रशिक्षण मेळावा आयोजन

सैनिक कल्याण पुणे विभागात माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक पदांची भरती…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जून – २०२५ चा मासिक व साप्ताहिकभव्य सोडतीचा निकाल जाहीर

चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकांसाठीइच्छुकांनी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सात तालुक्यांमध्ये होणार वाटप