vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

लघु उद्योजकांसाठी पुरस्कार; ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

लघु उद्योजकांसाठी पुरस्कार; ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी राज्य शासनातर्फे उत्कृष्ट लघुउद्योग घटकांची निवड करून जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०२६ यावर्षासाठी उत्कृष्ट लघुउद्योग जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत पात्र लघुउद्योजकांकडून दि. ३० ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राच्या उप आयुक्त करुणा खरात यांनी कळविले आहे

पात्रतेचे निकषः

 महाराष्ट्र शासनाच्या उद्योग आयुक्तालयांतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ही पुरस्कार योजना राबविण्यात येते. सन २०२६ च्या पुरस्कारासाठी दि. १ जानेवारी २०२६ पूर्वी स्थायी लघुउद्योग नोंदणी अथवा उद्यम नोंदणी झालेला आणि मागील दोन वर्षांपासून सलग उत्पादनात असलेला लघुउद्योग घटक पात्र राहील. तसेच संबंधित उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा

पुरस्काराचे स्वरुपः-या पुरस्कारांतर्गत प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास शाल, श्रीफळ व १५ हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास शाल, श्रीफळ व १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रेः-

इच्छुक उद्योजकांनी फोटोसह विहित नमुन्यातील अर्ज, उद्यम नोंदणी प्रमाणपत्र, मागील पाच वर्षांतील गुंतवणूक, रोजगार, उत्पादन व वर्षनिहाय नफ्याची माहिती, मागील तीन वर्षांचे ताळेबंद व नफा-तोटा पत्रक तसेच कर्ज खाते नियमित असल्याबाबत संबंधित बँकेचे पत्र आदी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३० ऑक्टोबर, मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, माहिती तंत्रज्ञान इमारत, दुसरा मजला, गरवारे स्टेडियमजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या उप आयुक्त करुणा खरात यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी १ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ*

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS) च्या २०२४ आणि २०२५ तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 58 उमेदवारांची निवड

vishwatmaklokswamivarta

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप

लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

सक्रीय बांधकाम कामगारांना वितरीत करण्याच्या-अत्यावश्यक संचाच्या वाटपाबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta