vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जलसंधारण व भूजल संवर्धनासाठी बेलवडे बुद्रुक येथे श्रमदान उपक्रमभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुढाकाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

जलसंधारण व भूजल संवर्धनासाठी बेलवडे बुद्रुक येथे श्रमदान उपक्रमभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुढाकाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी) : पावसाच्या पाण्याचा योग्य विनियोग, भूजल पातळी वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) वतीने करण्यात आले.जलसंधारण, भूजल संवर्धन आणि पाण्याच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी पेण तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथे नुकताच श्रमदान उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमास कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. प्रमोद रेड्डी, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रायगडचे वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रमोद पोळ, सहायक भूवैज्ञानिक तृप्ती रासकर व शुभम टिप्पट, तसेच कनिष्ठ भूवैज्ञानिक दत्तात्रय शेळके यांच्यासह रायगड कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बेलवडे बुद्रुक गावचे सरपंच आणि ग्रामस्थांनीही या श्रमदान उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करत पावसाचे पाणी अडविणे, ते जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न करणे, भूजल पातळी वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. भूजलाचा काटकसरीने वापर आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्यास भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते, याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली.भूजल संवर्धन ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून त्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभागही महत्त्वाचा आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणारे श्रमदानासारखे उपक्रम जलसंधारणाच्या कार्याला चालना देतात आणि पर्यावरण संवर्धनाबाबत समाजात जागरूकता निर्माण करतात, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे “पाणी अडवा, पाणी जिरवा आणि भूजल वाचवा” हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. जलसंधारण व भूजल संवर्धनासाठी ग्रामस्थांनी सातत्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जीएसडीए पथकाने केले.

000

संबंधित पोस्ट

आरोग्य शिक्षणासाठी प्रभावी माहिती, शिक्षण व संवाद यंत्रणा अधिक सक्षम करा– आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर; २२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद

निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे नांदेडमध्ये दाखल

राज्यात नव्या प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या स्थापनेसाठी निकष निश्चित – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करावेॲपद्वारे प्रक्रिया सुलभ ; अनुदान बंद होऊ नये म्हणून प्रशासनाचे आवाहन