vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनगणना 2027 चे वेळापत्रक जाहीर; 10 जानेवारीपासून स्व-गणनेची सुविधा

जनगणना 2027 चे वेळापत्रक जाहीर; 10 जानेवारीपासून स्व-गणनेची सुविधा

 

जालना, प्रतिनिधी आगामी जनगणना 2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष कामकाजाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या जनगणनेसाठी नागरिकांना 10 जानेवारी 2027 पासून 24 जानेवारी 2027 पर्यंत स्वतःची माहिती ऑनलाइन भरून देण्याची अर्थात ‘स्व-गणना’ करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयामार्फत जनगणनेचे वेळापत्रक अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांमध्ये जानेवारी 2027 पासून जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार आहे.

जनगणनेच्या निर्धारित वेळापत्रकानुसार, 10 ते 24 जानेवारी 2027 या कालावधीत नागरिकांना स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध असेल. त्यानंतर 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत प्रगणकांमार्फत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष लोकसंख्या गणना करण्यात येणार आहे. मुख्य गणनेनंतर 1 ते 5 मार्च 2027 या कालावधीत फेरतपासणी फेरी राबविण्यात येणार आहे.

या जनगणनेसाठी 1 मार्च 2027 रोजी मध्यरात्री 12 वाजता म्हणजेच वाजताची वेळ संदर्भ दिनांक म्हणून निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या या जनगणना मोहिमेत सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे. तसेच स्व-गणनेच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त बुधवारी नियोजन बैठकआदिवासी, दलित, ओबीसींसह सर्व समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पाणी अडवा, पाणी जिरवा, सुरक्षित भविष्य घडवा; जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक – आमदार संजय गायकवाड· ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटरला’उत्स्फूर्त प्रतिसाद· मान्यवरांनी दाखवली हिरवी झेंडी

vishwatmaklokswamivarta

आधुनिक फीड तंत्रज्ञानातून मत्स्यपालनाला नवी दिशा – मंत्री नितेश राणे

गतीमान प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा–अपर मुख्य सचिव विकास खारगे

vishwatmaklokswamivarta

तुमसे ना हो पयेगा’; ४७ हजार कोटींच्या घोषणेचा हिशेब द्या…! मराठवाड्याच्या विकासाच्या अनुशेषावर शिवसेनेचे जालन्यात लक्षवेधी आंदोलन- जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव

vishwatmaklokswamivarta

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान .