
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश धायगुडे व प्रियंका बर्डे-मोरे यांचा भाजपमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
जालना प्रतिनिधी-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश धायगुडे व प्रियंका बर्डे-मोरे यांचा भाजपमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भटके-विमुक्त विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. गणेश धायगुडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी विभागाच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती प्रियंका बर्डे-मोरे यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे व माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला.
यावेळी भास्कर आबा दानवे यांनी दोन्ही मान्यवरांचे पक्षात स्वागत करून त्यांचा सत्कार केला. तसेच त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धीविनायक मुळे, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, कृष्णा गायके, नागेश अंभोरे, सरपंच रवी कायंदे, विनायक राठोड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



