vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

नवजात बालकांच्या देखभालीसह नियमित पुनर्तपासणीवर भर**जिल्हा महिला व बाल रुग्णालयात राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त मार्गदर्शन*

नवजात बालकांच्या देखभालीसह नियमित पुनर्तपासणीवर भर**जिल्हा महिला व बाल रुग्णालयात राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त मार्गदर्शन*

गडचिरोली, प्रतिनिधी — अकाली जन्मलेल्या, जन्मतः कमी वजन असलेल्या आणि आजारी नवजात बालकांची विशेष काळजी तसेच रुग्णालयातून घरी गेल्यानंतर त्यांची नियमित वैद्यकीय पुनर्तपासणी करण्याचे महत्त्व राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्या हस्ते झाले.

१५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत पाळण्यात येणाऱ्या सप्ताहाची यंदाची संकल्पना ‘लहान बाळे, मोठी क्षमता; त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा’ अशी आहे. किशोरवयापासूनच मुलींच्या आरोग्य आणि पोषणाकडे लक्ष देण्याचे महत्त्व डॉ. किलनाके यांनी सांगितले. प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरचा सकस आहार, नवजात बालकाची देखभाल, केवळ स्तनपानाचे महत्त्व आणि माता व बालकाच्या काळजीत कुटुंबाचा सहभाग याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

जन्मानंतरचे पहिले २८ दिवस बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील असतात, असे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय करपते यांनी सांगितले. या काळात बालकातील धोक्याची लक्षणे ओळखणे, गरजेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भ सेवा घेणे आणि रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर बालकाच्या आरोग्यस्थितीनुसार पुनर्तपासणी करणे याविषयी त्यांनी माहिती दिली.

थंडीच्या दिवसांत लहान व आजारी बालकांना उबदार ठेवणे, नियमित लसीकरण आणि जन्मजात दोष असलेल्या बालकांसाठी जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रामार्फत (DEIC) उपलब्ध सेवांविषयीही कार्यक्रमात माहिती देण्यात आली. यासाठी दृकश्राव्य आणि माहितीपर साहित्याचा वापर करण्यात आला.यावेळी डॉ. नीलकंठ मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार, सहाय्यक अधिसेविका कविता पोतराजवार यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, परिचर्या प्रशिक्षणार्थी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रतिज्ञा रामटेके यांनी केले.

संबंधित पोस्ट

सेवा संकल्प अभियानातून खेर्डा येथे आरोग्य, स्वच्छता व शैक्षणिक उपक्रमांना चालना;गटविकास अधिकाऱ्यांची आरोग्य शिबिरासह विविध ठिकाणी भेट; स्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ गीतातून जनजागृतीचा संदेश; उदयनगर येथे CPHC प्रशिक्षण उत्साहात

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष- उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळेदोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच..

श्री गणेशा आरोग्याचा’ अंतर्गत जिल्ह्यात १ हजार ५७४ आरोग्य शिबिरे; ८९ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष सर्वेक्षण मोहिमेच आयोजन

vishwatmaklokswamivarta

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी**औषधसाठा, रुग्णांचा आहार आणि आरोग्य सेवांच्या गुणवत्तेबाबत सूचना*

vishwatmaklokswamivarta