vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

अमरावतीत २३ नोव्हेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’फियाट ऑटोमोबाईल’ कंपनीतील शिकाऊ उमेदवाराच्या ८७ पेक्षा अधिक जागांसाठी भरती,जिनस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.मध्ये ७० हून अधिक जागांसाठी भरती

अमरावतीत २३ नोव्हेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’फियाट ऑटोमोबाईल’ कंपनीतील शिकाऊ उमेदवाराच्या ८७ पेक्षा अधिक जागांसाठी भरती,जिनस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.मध्ये ७० हून अधिक जागांसाठी भरती

 

अमरावती, द प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २३ नोव्हेंबर रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रा.कंपनी-पुणे मध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून ८७ हून अधिक पदांसाठी संधी मिळणार आहे. तसेच अमरावतीतील जिनस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.मध्ये अमरावती विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये कायमस्वरूपी ७० हून अधिक पदांची संधी उपलब्ध होणार आहे.

            नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी या रोजगार मेळाव्याद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या मेळाव्यात फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रा.कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवार (एप्रिन्टनशीप) म्हणून नेमणूक करण्यात येईल.कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतील. मुलाखतीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे शिकाऊ उमेदवार म्हणून ८७ हून अधिक पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे. १८ ते २४ वर्षांच्या पुरुष व महिला उमेदवारांसाठी ही संधी असून उमेदवार १२ वी आणि आयटीआय उत्तीर्ण (सर्व ट्रेड उर्त्तीण उमेदवारांसाठी संधी) असावा. निवड झालेल्या उमेदवारास १८ हजार ८५० रुपये मासिक विद्यावेतन देण्यात येईल.यासोबतच वाहतूक व्यवस्था,कँटिन,गणवेश आणि शेफ्टीशुज अशा सुविधा पुरविण्यात येणार आहे.

        याच मेळाव्यात अमरावतीतील जिनस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.मध्ये अमरावती विभागातील अमरावती,अकोला,वाशिम,यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये कायमस्वरूपी ७० हून अधिक पदांसाठी नेमणूक करण्यात येईल. कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतील. मुलाखतीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मीटर बसविण्यासाठी कायमस्वरुपी नोकरीची संधी दिली जाणार आहे. १८ ते ३५ वर्षांच्या केवळ पुरुष उमेदवारांसाठी ही संधी असून उमेदवार इयत्ता१० वी, इयत्ता १२ वी,डिप्लोमा,पदवीधर उत्तीर्ण असावा. निवड झालेल्या उमेदवारास २० हजार रुपये मासिक वेतन देण्यात येईल.

      इच्छुक उमेदवारांनी २३ नोव्हेंबर रोजी स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईझ फोटो आणि सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह (व छायांकित प्रतींसह) केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. याबाबत काही अडचण किंवा अधिक माहिती माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०७२१-२५६६०६६ / ८३०८९५६२३६ / ७६२०५६०१२५ / ८६०५६५४०२५ वर तसेच amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येणार आहे.

००००

संबंधित पोस्ट

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

vishwatmaklokswamivarta

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन सिंचन योजनांना गती देण्यासाठी सोलापूर कार्यालय ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम

डॉ. संजय मुन हे फुले – आंबेडकरी चळवळीचे प्रभावी प्रसारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमा यशवंतराव आंबेडकर यांचे गौरोद्गार : डॉ. संजय मुन यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी राज्यात विशेष  मोहीम

vishwatmaklokswamivarta