vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महेश सारणीकर यांना राज्यस्तरीय ‘उद्यम सह्याद्री पुरस्कार २०२६’ प्रदान !उद्यमशीलता आणि सामाजिक कार्याचा अभिमानास्पद गौरव;उल्लेखनीय कार्याची दखल; छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव

महेश सारणीकर यांना राज्यस्तरीय ‘उद्यम सह्याद्री पुरस्कार २०२६’ प्रदान !उद्यमशीलता आणि सामाजिक कार्याचा अभिमानास्पद गौरव;उल्लेखनीय कार्याची दखल; छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या हस्ते गौरव

छ. संभाजीनगर (प्रतिनिधी) : व्यावसायिकता, उद्यमशीलता आणि सामाजिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि पोलिसमित्र समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, सिलिकॉन सिस्टिम्सचे संस्थापक संचालक, कै. तात्यासाहेब पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे राज्य सचिव आणि दैनिक दक्षवेधचे मुख्य संपादक महेश बळवंतराव सारणीकर यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘उद्यम सह्याद्री पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. उद्यम इन्फो सोल्युशन्स प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला.

  माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिसमित्र समिती आणि स्व. तात्यासाहेब पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक व जनहिताची कामे, याव्यतिरिक्त सिलिकॉन सिस्टिम्स या आपल्या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक आणि सामाजिक जडणघडणीला आजपर्यंत लावलेला हातभार, दैनिक दक्षवेधच्या माध्यमातून सातत्यपूर्ण समाजभान वाढवणारे लिखाण, व्यावसायिकता, उद्यमशीलता आणि सामाजिक भान या सर्वसमावेशक कार्याची दखल म्हणून महेश सारणीकर यांना हा सन्मान देण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील आईनस्टाईन हॉल, महात्मा गांधी विद्यापीठ, सिडको एन-६ येथे आयोजित समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.   यावेळी नामांकित उद्योजक, संचालक, देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टर, मनू इलेक्ट्रीकल्स, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन आणि आयटीआयचे शैक्षणिक समिती सदस्य डॉ. व्ही.एस. देवळणकर तसेच नवयुग इंजिनिअर्स आणि पेंटागॉन इंडस्ट्रीज, एमआयडीसी, अहिल्यानगरचे संचालक संजय पारनाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.   उद्यम इन्फो सोल्युशन्सचे संस्थापक संचालक उल्हास भाले, संचालिका सौ. दीपा भाले, कार्यक्रम समन्वयक तुषार जहागीरदार, श्रेयस आपटे, हर्षित राजहंस, सुरभी देशपांडे यांच्यासह अनेक उद्योजकांची उपस्थिती होती.  या पुरस्कारामुळे महेश सारणीकर यांच्या सामाजिक, पत्रकारिता आणि जनहिताच्या कार्याला राज्यस्तरावर मानाची पावती मिळाली असून, त्यांच्या या गौरवाबद्दल सामाजिक, राजकीय, व्यावसायिक आणि उद्योजक अश्या विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत

000

 

संबंधित पोस्ट

सातारा येथील चतुर्थ मंदिर परिषदेसाठी राज्यभरातून ११०० हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती !*हिंदूंच्या प्रथा-परंपरा कुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कठोर कारवाई करेल* *मंदिरे आणि गडकिल्ले यांवरील मंदिरांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी प्रसंगी ‘बुलडोझर’ कारवाई !**मंदिरांच्या सर्व समस्यांसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू ! -* भरतशेठ गोगावले, फलोत्पादन आणि रोजगार हमीमंत्री

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे,सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

मकर संक्रांतीचे महत्त्व-   अध्यात्मिक वार्ता- 

vishwatmaklokswamivarta

यंदाचा उत्सव होणार आणखी खास!-नवी मुंबई महानगरपालिका महापौर चषक गणेशोत्सव स्पर्धा २०२६–२७ अंतर्गत आयोजित ५ दिवसीय घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या घरच्या गणरायाच्या उत्सवाला मिळवून द्या मानाचा सन्मान!

vishwatmaklokswamivarta