vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांचा जालनातून आरोग्य संवाद,आरोग्य संवाद यात्रेअंतर्गत आरोग्य संस्थांची पाहणी, आरोग्य योजनांचा आढावा आणि पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी संवाद

आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांचा जालनातून आरोग्य संवाद,आरोग्य संवाद यात्रेअंतर्गत आरोग्य संस्थांची पाहणी, आरोग्य योजनांचा आढावा आणि पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी संवाद

जालना, प्रतिनिधी::राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने दि. 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘आरोग्य संवाद यात्रा’ राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत कितपत पोहोचत आहे, आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध सुविधांचा दर्जा, नागरिकांचे अनुभव आणि आरोग्य सेवांमधील अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत. या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री श्री. प्रकाश आबिटकर हे शुक्रवार, दि. 27 नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेणार असून विविध स्तरांवरील पदाधिकारी, अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.मंत्री श्री. आबिटकर हे दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबई येथून जालना कडे प्रयाण करणार आहेत. यावेळी ते जालना येथील एम सी एच विंग जिल्हा महिला रुग्णालय जालना येथे भेट देऊन उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय, अंबड व घनसावंगी येथे भेट देऊन उद्घाटन करणार आहेत व कामकाजाचा आढावा घेणार आहेत. एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती व जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कार्यरत आरोग्य समित्यांच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी आरोग्य संवाद दूरदृश्य प्रणाली द्वारे जिल्हा परिषद जालना येथे होणार आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालय कुंभेफळ जिल्हा जालना येथील इमारत व बांधकामाची पाहणी करणार आहेत. या संवादाच्या माध्यमातून आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, स्थानिक पातळीवरील अडचणी आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानासह ‘तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ या उपक्रमाचाही आढावा घेण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांमधील औषधसाठा, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, मनुष्यबळ, स्वच्छता, पाणीपुरवठा, जैववैद्यकीय कचऱ्याचे संकलन व शास्त्रोक्त विल्हेवाट, संदर्भ सेवा, रुग्णवाहिका व्यवस्था, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा तसेच लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी या बाबींची सविस्तर तपासणी करण्यात येणार आहे.

आरोग्य संवाद यात्रेचा मुख्य उद्देश केवळ आरोग्य संस्थांची पाहणी करणे नसून, नागरिकांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा अनुभव जाणून घेऊन त्यातील त्रुटी दूर करणे, चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता वाढविणे हा आहे. नागरिकांच्या सूचना व अनुभवांच्या आधारे आरोग्य सेवा अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ,पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक विभागीय आयुक्तांकडून वृक्ष लागवड

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने कर्ज वाटप, स्वयंरोजगार मेळाव्याचे 30 एप्रिल रोजी आयोजन 

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ -उभाटा आणि मनसे यांचा | मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर..

vishwatmaklokswamivarta

महापौर, पोलीस आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांची काळाराम मंदिराला भेट व पाहणी

धारावी संत कक्कया मार्ग व संत रोहिदास मार्ग छेद करणारी कचराकुंडी हटवा..

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-शेतकऱ्यांसोबत दिवाळी, बांधावरून संवाद!

vishwatmaklokswamivarta