vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

एचआयव्ही संसर्ग होऊ नये यासाठी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्या- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

एचआयव्ही संसर्ग होऊ नये यासाठी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्या- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

        सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यात एचआयव्ही संसर्ग होऊ नये यासाठी व्यापक जनजागृती, नियमित तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळणाऱ्या सर्व रुग्णांना नियमित औषधोपचाराखाली आणून त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.

     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक सावंत, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी वैभव पाटील, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. श्रद्धा पाटील यांच्यासह महानगरपालिका, एआरटी सेंटर, रक्तपेढ्यांचे अधिकारी आणि अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा व कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. एचआयव्ही संसर्गाचे निदान झालेल्या प्रत्येक रुग्णाला वेळेत औषधोपचार उपलब्ध करून देणे, नियमित तपासणी करणे आणि उपचारांमध्ये सातत्य राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गाबाबतच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. सन 2010 च्या तुलनेत सन 2026 पर्यंत प्रतिवर्षी एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याची बाब सकारात्मक असल्याचे नमूद करून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ही प्रगती कायम राखण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक प्रभावीपणे काम करावे. एचआयव्ही संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती करावी तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

      ‘मोबिलायझेशन ऑफ एड्स सुरक्षा’ (Mobilization of AIDS Suraksha) या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्याने सुरक्षित स्तर गाठला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भविष्यात नव्याने एचआयव्ही संसर्ग होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही करण्यात आले.

         यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक सावंत यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गाची सद्यस्थिती, एड्स प्रतिबंध व नियंत्रणासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, तपासणी व उपचार व्यवस्था तसेच जनजागृतीच्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.

0000

संबंधित पोस्ट

नगर पंचायत कोरेगाव आणि तालुका कार्यालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी येथे NQAS राज्यस्तरीय मूल्यांकन संपन्न; आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर ‘NQAS’ टीमकडून समाधान

ससून रुग्णालयात जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे अतिजोखमीच्या मातेचे वाचले प्राण; अचलपूरच्या मडकी येथील आरोग्य चमूची कामगिरी

पारुंडी येथे ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर ३० वर्षांवरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी

vishwatmaklokswamivarta