vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बार्टी, समतादूत प्रकल्प यांच्या मार्फत संविधान रॅलीचे आयोजन

बार्टी, समतादूत प्रकल्प यांच्या मार्फत संविधान रॅलीचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, भारतीय बौद्ध महासभा शाखा सावरकर नगर व ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 120 सावरकर नगर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिना निमित्त कार्यक्रम घेण्यात आला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन संविधानातील हक्क यावर माहिती देऊन संविधान रॅली काढण्यात आली.सदर कार्यक्रम ला स्थानिक नगरसेवक प्रभाग क्र. 14 येथील मा. दिलीप बारटक्के, बौद्ध महासभा सावरकर नगर शाखा अध्यक्ष राजेश कांबळे, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ठाणे प्रतिनिधी सुधीर नवले, अनिल काकुळते शाळेतील मुख्याध्यापक राठोड व इतर शिक्षक, बार्टी प्रकल्प अधिकारी मेघा पवार, समतादूत सविता औटी व इतर स्थानिक नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी मध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली यावेळी बार्टी संस्थे मार्फत उत्तेजित विद्यार्थी यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आले, नगरसेवक यांनी संविधान विषयी जनजागृती होणे का आवश्यक आहे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले राजेश कांबळे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार फक्त विद्यार्थी यांच्या सहकार्य मुळे पडला त्यामुळे विद्यार्थी चे विशेष कौतुक केले सदर कार्यक्रम समाजकल्याण आयुक्त तथा महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ मुंडे , निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शन खाली राबविला जात आहे अशी माहिती बार्टी प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांनी दिली आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

काशीद समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश**”रोबोटिक बोयो” ची उपयुक्तता पुन्हा झाली अधोरेखित*

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन आलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन

नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये 149 समुहांचा उदंड प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

कर्जतच्या भालिवडीत ​कन्या आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्तीचा जागर*श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम निमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार”*

माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..