vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आज  27 नोव्हेंबरपासून शहरात ड्रोन उड्डाणास बंदी

आज  27 नोव्हेंबरपासून शहरात ड्रोन उड्डाणास बंदी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच दहशतवादी व राष्ट्रविरोधी घटकांकडून ड्रोन आणि अन्य हवाई साधनांचा संभाव्य गैरवापर रोखण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्रोन उड्डाणासह रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून यांच्या उड्डाणांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये जारी करण्यात आलेला हा आदेश 27 नोव्हेंबर 2026 पासून 27 जानेवारी 2027 पर्यंत लागू राहणार आहे. या आदेशातून छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून हवाई पाळत ठेवण्याची कारवाई तसेच पोलीस आयुक्तांच्या विशेष परवानगीने करण्यात येणाऱ्या कारवाईला सूट देण्यात आली आहे.

 या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आदेशाचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

लेख : नवरात्र व्रताचा इतिहास, महत्त्व आणि शास्त्र- सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध #वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त*

आपत्ती निवारणासाठी प्रशासन अलर्ट; पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश दारव्ह्यातील दहेली येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक, आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांचा घेतला आढावा

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 24 एप्रिलला