vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यात खबऱ्याने गेम, जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई, जुगाऱ्यांची काढली वरात..

महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यात खबऱ्याने गेम, जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई, जुगाऱ्यांची काढली वरात…

: राज्य गुन्हे प्रतिनिधी

धाराशिव पोलिसांनी मोठी कारवाई करत वाशी शहरातील एका मोठ्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारला. या कारवाईत २४ जणांच्या मुसक्या आवळण्याच आल्या असून १० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना खबऱ्याचा फोन आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींची संख्या जास्त असल्यामुळे जुगाऱ्यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यापर्यंत चालतच नेले. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.

 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पांलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत अवैद्य धंदयाची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिला होते. रविवारी, ९ जुलै रोजी ४ वाजण्याच्या सुमारास एम. रमेश सहाय्यक पोलीस अधीक्षक एम.रमेश (उप विभाग कळंब) यांना पोलीस स्टेशन वाशी हद्दीत पारा चौक येथे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जुने बसस्थानकाच्या बाजूला तिर्रट नावाचा जुगार चालू आहे. ही माहिती खात्रीशीर असल्याचे समजल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कळंब येथील अधिकारी व अमंलदार यांच्यासह त्यांनी ४.३० वाजता हा छापा मारला.

 

तेथे २४ लोक गोलकार बसून तिर्रट नावाचा जुगार खेळत असतांना आढळले. त्यांच्याकडे एकूण रोख रक्कम ९९,०१० ₹ तसेच १२ मोटर सायकली होत्या. त्यांची अंदाजे एकूण किंमत ५,६५,००० व एकूण २३ मोबाईल फोन (एकूण २,०९००० रु) तसेच एकूण पत्याचे २५५ बॉक्स (किंमत अंदाजे १,९८,००० रुपये) असा एकूण १०,७१,९१० रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींविरुध्द कलम ४,५ (महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४,५ प्रमाणे पोलीस ठाणे वाशी येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पांलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशाने एम. रमेश सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश (उपविभाग कळंब), यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस स्टेशन कळंब व उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब येथील पोलीस उपनिरिक्षक पुजरवाड, पोलीस अमंलदार ७४८/ फतेपुरे, ९७६/ तारळकर, पोलीस नाईक १०६५/ सय्यद, ४८१/ जाधव, पोलीस ठाणे कळंब, पोलीस नाईक शेख, पोलीस अमंलदार भांगे, पठाण, खांडेकर, गरड, राऊत, चव्हाण, पोलीस हवालदार चाफेकर, पोलीस ठाणे वाशी येथील सहा. पोलीस निरीक्षक ससाणे, पोलीस हावलदार लोंढे, पोलीस नाईक लाटे, यादव, सय्यद, सुरवसे, पोलीस अमंलदार भैरट वारे, घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित पोस्ट

डी आय आर आय ची मुंबई विमानतळ वर मोठी कारवाई, पॅरिसहून आलेले 15 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ केले जप्त..

vishwatmaklokswamivarta

शाहरुख खानचा मुलगा  आर्यन खान सह इतर 7 जणांची जे जे रुग्णालयात टेस्ट

ठाण्यात पोलिस असल्याचं भासवून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या

vishwatmaklokswamivarta

मुंबईत हादरवून टाकणारी घटना : शहरातील मिरा रोड परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’  मध्ये राहणाऱ्या एका तरुणीची पार्टनरकडून हत्या आरोपी अटक..

NIAने अटक केलेल्या डी गँगच्या दोन हस्तकांच्या टेरर फंडिंग’मागे  राजकीय कनेक्शन, NIAच्या तपासात उघड

महादेव बेटिंग ॲप प्रकरण: अभिनेता साहिल खान फरार;