vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात आता सेवा संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निर्माण होणार सेंद्रीय परसबागा आणि गावे होणार ॲमिनीमिया मुक्त..

ठाणे जिल्ह्यात आता सेवा संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निर्माण होणार सेंद्रीय परसबागा आणि गावे होणार ॲमिनीमिया मुक्त…..

 

 

 

        ठाणे, प्रतिनिधी- दि.24 व 25 फेबुवारी रोजी सहायक ट्रस्ट मुंबई, यांच्यावतीने नाशिक त्र्यंबकेश्वर येथे मंथन हे दोन दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी देशभरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनीधी ची विशेष उपस्थिति होती. भारतात गावपातळीवर कुपोषण व ॲनिमिया (रक्तक्षय) याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. शासकिय यंत्रणांच्या सामजिक संस्थेच्या माध्यमातूनच होऊ शकते, असे प्रतिपादन सहाय्यक ट्रस्ट च्या विश्वत श्रीमती दिलनवाझ वरियावा यांनी केले.

 

सेवा संस्था ठाणे ही ॲनिमिया मुक्त गाव करण्यासाठी महाराष्ट्रातील ठाणे व परभणी जिल्ह्यात सेंद्रिय परसबाग तयार करण्यासाठी गावपातळीवर काम करत आहे. यांच्या हिमोग्योबन तपासणी करून त्यांना पोषक आहाराचे महत्त्व समाजावून मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय परसबाग निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच त्यासाठी आवश्यक भाजीपाला व फळे यांची बियाणेचे वाटप देखील संस्थेने केले आहे. संस्थेच्यावतीने ठाणे व परभणी जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या सेंद्रिय परसबागच्या सध्याचीस्थिती व भविष्यातील सुधारणा तसेच येणाऱ्या आर्थिक समस्या याविषयी सविस्तर माहिती सेवा संस्थेच्या वतीने ॲड. संजीवनी जाधव यांनी दिली. या दोन दिवसीय चर्चासत्रात देशभारातील सामिजिक संस्थेच्या प्रतिनिधी, प्रयोगशील शेतकरी, बीजवसंवर्धन करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

000000

संबंधित पोस्ट

दहशतवादी हल्ल्यातील पोलीस हुतात्मांना राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व; हर्षवीर सिंग सर्वोत्तम भारतीय सायकलपटू बजाज पुणे ग्रँड टूर २०२६

vishwatmaklokswamivarta

संविधान जागर समिती महाराष्ट्रच्या वतीने राज्यभरात ” घर घर संविधान ” ह्या अभियानाअंतर्गत घरोघरी संविधानाचा जागर राबाविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणूक २०२४-निवडणूक निरीक्षक (पोलीस) यांची नागरिकांना भेटण्याची वेळ व ठिकाण

vishwatmaklokswamivarta

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांना 8 ऑगस्टपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागेल; निवडणूक आयोगाने दिले निर्देश