vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दि. ३ मार्च २०२४

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दि. ३ मार्च २०२४

 

 

 

        ठाणे, प्रतिनिधी :- ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार, दि. ३ मार्च २०२४ रोजी ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, शहापुर, भिवंडी व मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाच तालुक्यातील ५ वर्षापर्यंतच्या एकूण १ लाख ३६ हजार ७५६ बालकांना तसेच बदलापूर व अंबरनाथ क्षेत्रातील एकूण ६८ हजार ५९५ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे.

 

जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत ग्रामीण व बदलापूर अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात एकूण १ हजार ८६८ बुथवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी ५ हजार ७७८ कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. तसेच दि. ३ मार्च २०२४ रोजी बूथवर लसीकरण केल्यानंतर राहिलेल्या बालकांना कर्मचारी घरोघरी जाऊन पुढील ३ ते ५ दिवसात पोलिओचे लसीकरण करणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

 

ही मोहीम यशस्वी करण्याकरिता जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते व जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. कैलास पवार यांनी या मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त लाभार्थीनी लसीकरण करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

शासकीय योजनांच्या लाभासाठी समन्वय यंत्रणा म्हणून पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईन उपयुक्त ठरेल      – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- पालकमंत्री कार्यालय हेल्पलाईनचे उद्‌घाटन- सेवा, सुशासन, गरीब कल्याणाचे उद्दिष्ट गतिशील करण्याचा हेतू- हेल्पलाईन संपर्क क्रमांक 8808806088064

मेडिक्लेमची रक्कम मिळण्यासाठी रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्याची गरज नाही; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय…

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील-सहायक आयुक्त पदाच्या 311 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू· पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे ठोस निर्णय..

vishwatmaklokswamivarta

उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन

शिवसेना एकच आहे. एकच राहील. दुसरा कुठला गट  त्याला मी शिवसेना मानत नाही. केवळ निवडून आलेले लोकच राजकीय पक्ष असतील तर उद्या कोणीही एखादा उद्योगपतीही पंतप्रधान होईल असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला

vishwatmaklokswamivarta

रियल इस्टेट क्षेत्राने गरिबांना किफायतशीर घरे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करावी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta