vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

स्वयंरोजगाराच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

स्वयंरोजगाराच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलडाणा, प्रतिनिधी : वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना राबविण्यात येते. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, तसेच पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ या दोन उपकंपनीमार्फत वडार व रामोशी समाजातील नागरिकांसाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, लघू उद्योग, वाहतूक क्षेत्रातील संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपारीक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक आणि महामंडळामाध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना सुरु आहे.

 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. सदर दोन्ही योजनांमध्ये लाभार्थ्यांना मुद्दल आणि व्याज बँकेत भरावयाची आहे. महामंडळातर्फे व्याजाची 12 टक्यांपर्यंत रक्कम लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेबाबत मार्गदर्शक सूचना महामंडळाच्या vjnt.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेच्या लाभासाठी पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.

 

बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत आणि थेट कर्ज योजनेंतर्गत 1 रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. महामंडळाच्या कार्यालयात योजनेचे अर्ज उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा. इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात भाडेतत्वावर भोजनकक्ष, उपहारगृहासाठी 25 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके वतक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; ८७ उमेदवारांची निवड

मासेमारी करणाऱ्यांनाही मिळणार किसान क्रेडीट कार्ड;मच्छिमार संस्थांना नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीटी मालिका सुरु**शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा*

vishwatmaklokswamivarta