vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे यांच्या हस्ते  पार पडला. 

 मौजे बाजीउम्रद ता. जि. जालना येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे यांच्या हस्ते  पार पडला.

जालना प्रतिनिधी

जवळपास १ कोटी ८३ लक्ष्य रुपयांचा निधी २०२३-२४ वर्षांमध्ये बाजीउम्रद गावासाठी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे, यावेळी गावात सामाजिक सभागृहाचे बांधकामासाठी खासदार निधी अंतर्गत १० लक्ष्य रुपये, २५१५ योजनेंतर्गत सी. सी. रोड चे बांधकाम करण्यासाठी ५ लक्ष्य रुपये, तसेच खासदार निधी अंतर्गत नालीसह सी.सी. रोड चे बांधकाम करण्यासाठी २७ लक्ष्य रुपये, तांडा वस्ती योजनेंतर्गत बाजीउम्रद तांडा, रामनाईक तांडा येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १० लक्ष्य रुपये, तांडा वस्ती योजनेंतर्गत सी.सी. रोड बांधकाम करण्यासाठी ५ लक्ष्य रुपये व भूमिगत नालीचे बांधकाम करण्यासाठी १० लक्ष्य रुपये तसेच तांडा वस्ती योजनेंतर्गत सि.सि. रोड चे बांधकामासाठी १० लक्ष्य रुपये असा निधी उपलब्ध करून दिला होता, यावेळी या सर्व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले.

 

यावेळी बोलताना भास्करआबा यांनी सांगितले कि, “बाजीउम्रद गावात हि विकासकामे मा. रावसाहेबदादा दानवे यांच्या नेतृत्वात निरंतर होतच राहतील. जालना जिल्ह्ह्यात नवीन जालना-जळगाव रेल्वे, ड्राय पोर्ट सारखे मोठे प्रकल्प येत आहेत त्यांच्यामुळेच आज जालना शहर देशाचा नकाशावर झळकत आहे, अजिंठा-बुलढाणा, जालना-वडिगोद्री यांसारखे प्रमुख रस्ते त्याच प्रमाणे भारतमाला योजनेअंतर्गत बांधण्यात येणारा ६ पदरी जालना-संभाजीनगर यांसारखे जवळपास ६००० कोटींचे रस्ते दादांच्या माध्यमातून बांधण्यात आले अहेत असे सांगितले. त्याचप्रमाणे यापुढेही आपल्या बाजीउम्रद गावाला कधीही कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन यावेळी दिले.

 

तसेच गावकऱ्यांच्या मागणी नुसार गावात ४ ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ९५०५ योजनेंतर्गत प्रत्येकी १० लक्ष्य रुपये, तसेच ९५०५ योजनेंतर्गत गावांतर्गत सि.सि. रोड चे बांधकाम करण्यासाठी १० लक्ष्य रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, यावेळी या नवीन कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्याच प्रमाणे २ ठिकाणी मातोश्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत पाणंद रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी १८ लक्ष्य रुपये व बाजीउम्रद ते निरखेडा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १० लक्ष्य रुपये निधी मंजूर करून या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले.

[09/09, 9:17 pm] Swamiji: याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, तालुका अध्यक्ष वसंतराव शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक संजय डोंगरे, दिपक पडूळ, गणेश सवडे, अनिल सरकाटे, कैलास उबाळे, विष्णु डोंगरे, बद्रीभाऊ भसांडे, काकासाहेब घुले, निवृत्ती लंके, निवृत्ती गायकवाड, उत्तमभाऊ घुले, ज्ञानेश्वर राठोड, अतुल चव्हाण, विनायक पवार, राजाभाऊ कळकुंभे, राजू राठोड, गजानन घुले, पुजाराम भुतेकर, राम जाधव, सुभाषराव भुतेकर, गौतम सरकाटे, राजाराम जाधव, दत्ता जाधव, विलास जाधव, गोपाल चौधरी, सुरेशराव डोंगरे, श्रीधर डोंगरे, बबन डोंगरे, नामदेव पडूळ, जगन पडूळ, रामेश्वर डोंगरे, महादेव डोंगरे, निवृत्ती डोंगरे, राजू आप्पा डोंगरे, शरद पडूळ, बळीराम पडूळ, सोपानराव कोरडे, हरिभाऊ लहाने, गणेश सवडे, उद्धवराव डोंगरे, नितीन डोंगरे, योगेश डोंगरे, मनोहर डोंगरे, चांगदेव डोंगरे, कृष्णा थोरात, विकास शिंदे, बाळू पडूळ, गणेश शिंदे, भगवान लोखंडे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसह दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ

सामान्य विद्यार्थ्यालाही सैनिकी शाळांमध्ये शिक्षणासाठी सकारात्मक निर्णय घेणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबईतील दादर परिसरातील नामांकित कोहिनूर इमारतीच्या मुंबई महानगर पालिकेच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली16 ते 17 वाहनांचे नुकसान..

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्र 2047 – व्हिजन डॉक्युमेंट सर्वेक्षणात सहभागासाठी उरले फक्त सहा दिवस..

वंचित बहुजन आघाडीचे  प्रमुख आणि भारतरत्न डॉ.  बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील भाजप सरकारवर  जोरदार हल्लाबोल

फलटणमध्ये शेतकरी व ग्रामपंचायतीच्या – १०० एकर क्षेत्रावर फळबाग व देशी वृक्ष लागवड-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहानाला उद्योग जगताचाही सकारात्मक प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta