vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिड व नि:पक्ष पत्रकारिता करावी- पत्रकार अब्दुल कय्यूम,दर्पण दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आयोजित आरोग्य शिबिर संपन्न…

कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिड व नि:पक्ष पत्रकारिता करावी- पत्रकार अब्दुल कय्यूम,दर्पण दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आयोजित आरोग्य शिबिर संपन्न…

 

औरंगाबाद (प्रतिनिधी):- माध्यम हे समाजाचा आरसा आहे. माध्यमावर चांगला समाज घडवण्याची जवाबदारी आहे. बातमीचे खरे लिखान करणारे, खरी गोष्ट समाजासमोर आणण्यासाठी पत्रकारांसमोर सध्या मोठे आव्हान उभे झालेले आहे. खरी बातमी लिहणारे, दाखवणारे निर्भीड पत्रकारिता करणा-यांना नोक-या वाचवणे कठीण बणले आहे. तरी समाजाला चांगली दिशा देण्यासाठी पत्रकाराने कोणत्याही दबावाला बळी न पडता लिखान केले पाहिजे. अलीकडच्या काळात माध्यमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. विश्वासार्हता टीकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पत्रकारिता करून सरकारने व प्रशासनाने काही चूकीचे निर्णय घेतले तर ते समाजासमोर आले पाहिजे. चांगले निर्णय घेतल्यास ती माहीती समाजापर्यंत गेली पाहिजे. असे प्रतिपादन दर्पणदिनाचा आयोजित कार्यक्रमात व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष अब्दुल कय्यूम बोलत होते. दर्पण दिनानिमित्त माजी महापौर नंदकुमार घोडेले, ज्येष्ठ पत्रकार रियाजोद्दीन देशमुख, शेख मजहर यांनी आपले मत मांडले.

दर्पण दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग तर्पेâ आयोजित नूर हॉस्पिटल बायजीपुरा औरंगाबाद येथे पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास ५५ पत्रकार व त्यांच्या परिवारांचे आरोग्य तपासणी करण्यात आली असून यावेळी औरंगाबाद शहराचे माजी महापौर नंदकुमार घोडेले, समाजसेवक साजिद मौलाना, ज्येष्ठ पत्रकार आर जी देशमुख, दैनिक सकाळचे अनिल कुमार जमदाडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय संघटक दैनिक पुण्यनगरीचे परवेज खान,शेख लाल शेख, सुरेश शिरसागर, ज्येष्ठ पत्रकार शेख मजहर, एम ए शकील,शेख शफीक, तोफिक शहेबाज,सुजित ताजने, संजय हिंगोलीकर, बाजीराव सोनवणे, के एम आय सय्यद, मिर्झा शफी बेग, पत्रकार तथा एडवोकेट सय्यद मोईन, सय्यद नदीम सौदागर, दिशा सुरवसे पाटील, सय्यद करीम, साजिद पटेल आयोजक व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे प्रदेश कार्याध्यक्ष अब्दुल कय्यूम व जिल्हाध्यक्ष साप्ताहिक विंग डॉ शकील शेख हे होते. डॉ. शकील शेख व महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे या आरोग्य शिबिरात मदत मिळाली.

संबंधित पोस्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना देणार भेट

कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

vishwatmaklokswamivarta

रेल्वे तिकिटाचे आरक्षण – तत्काळ तिकीटासाठी-मोठा बदल ओटीपी अनिवार्य-दलाल मुक्त करण्यासाठी एक निर्णायक पाऊल..

vishwatmaklokswamivarta

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सचिव स्तरीय समितीने उपाययोजना करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•कांदा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणीकांदा प्रश्न बाबत विधानभवनात बैठक

vishwatmaklokswamivarta

अधिकाऱ्यांनी लोकमान्यता मिळेल असे प्रशासकीय कार्य करावे – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम; मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा