vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सारथी ऑनलाईन प्रणालीवर फेसलेस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

सारथी ऑनलाईन प्रणालीवर फेसलेस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

     सांगली, प्रतिनिधी : सारथी प्रणालीवर अनुज्ञप्तीच्या एकूण 18 सेवा प्रत्यक्षपणे फेसलेसद्वारे वितरीत करण्यात आलेल्या आहेत. या सारथी फेसलेस सेवा प्रणालीचे संकेतस्थळ https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice हे आहे. ‍ जास्तीत जास्त नागरिक व अनुज्ञप्तीधारकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

  प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सारथी ऑनलाईन प्रणालीवर फेसलेस सेवेचा गतवर्षी जानेवारी ते  डिसेंबर या कालावधीत 1 हजार 388 अनुज्ञप्तीधारकांनी लाभ घेतला आहे. ऑनलाईन सारथी फेसलेस (संपर्करहित) सेवांमध्ये शिकाऊ लायसन, दुय्यम शिकाऊ लायसन प्रत, शिकाऊ लायसनमध्ये पत्त्यात बदल, शिकाऊ लायसन / पक्के लायसन /वाहक लायसनमध्ये भ्रमणध्वनी अद्ययावत करणे, दुय्यम लायसन प्रत, नुतनीकरण लायसन, पक्क्या लायसनमध्ये पत्त्यात बदल, पक्क्या लायसनमध्ये बदल आदींसह एकूण 18 सेवांचा समावेश होतो. तरी जास्तीत जास्त नागरिक व अनुज्ञप्तीधारकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतूक वेगवान होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्रींचे निधन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कुटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट

कारागृहात निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे*महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी

रस्ते सुरक्षा जनजागृती ही एक राष्ट्रीय चळवळ असून, रस्ते वापरणाऱ्या सगळ्यांनीच जबाबादारीने वागण्याची अपेक्षा: रस्ते वाहतूक राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा

vishwatmaklokswamivarta

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन ब्राम्हण सभा, डोंबिवली पूर्व, मुंबई येथे भव्य संगीत दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta