vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने-महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख,नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने-महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख,नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

 

ठाणे, प्रतिनिधी:- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वी पणे करण्यात आले आहे. प्रथम 14 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त 2 औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील 132 आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला.

त्यानुसार अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली.प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थेच्या नामकरणाबाबत सविस्तर माहितीसाठी सोबत शासन निर्णय जोडला आहे.00

संबंधित पोस्ट

हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालयांना आज दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..

विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध-होण्यासाठी ‘दाखला आपल्या दारी’ उपक्रम 

शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार; नवी मुंबईत त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दि चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन

सुनिर्मल फाऊंडेशनकडून धारावीतील १०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

आश्रमशाळा शिक्षक–कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत सहविचार सभाआमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने अपर आयुक्त यांच्यासोबत बैठक..

vishwatmaklokswamivarta