vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी..

बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी..

 

राज्य प्रतिनिधी- छत्रपती संभाजीनगर,  संचालक आपत्ती व्यवस्थापन प्रभाग व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलाच्या निर्देशानुसार बोअरवेल्स संदर्भात मार्गदर्शक सुचना जारी केल्या असून त्यासंदर्भात वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण विभाग यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सुचना याप्रमाणे-

1. उघड्या बोअरवेल यांना अनिवार्य सिल करणे, जेणेकरुन त्याठिकाणी जाण्यास मज्जाव होईल. यासाठी संबंधित जमीन मालक आणि ड्रिलिंग एजन्सी यांची जबाबदारी निश्चित करावी.

2. सर्व बोअरवेल्स यांच्या नोंदणीची प्रणाली स्थापन करणे.

3. उघड्या बोअरवेल संबंधी असलेली जोखीम व लहान मुलांची सुरक्षा याबाबत व्यापक जनजागृती मोहिम राबविणे.

4. बोअरवेल ऑपरेटर्स किंवा जमीन मालक यांनी बोअरवेलच्या सभोवताली सुरक्षेच्या अनुषंगाने अडथळे निर्माण करणे.

5. असुरक्षित बोअरवेल ओळखण्यासाठी व त्यासंबंधी निराकरण करण्यासाठी समुदाय संचलित यंत्रणा कार्यान्वित करणे.

6. सर्वोच्च न्यायालय यांनी जारी केल्याप्रमाणे बोअरवेल सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधिताकडून कठोर दंड आकारणी करणे.

7. सुरक्षा नियमांचे पालन होते किंवा कसे याबाबत खात्री करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नियमित तपासणी करणे.

8. संबंधित अधिकाऱ्यांनी सुरक्षा नियमांचे पालन होत आहे याबाबतची खातरजमा करण्यासाठी नियमित तपासणी करणे.

 यासुचनांची व आदेशाची अवज्ञा झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये कोणतीही व्यक्ती संस्था, अथवा समूह यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विनोद खिरोळकर यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला-सव्वा कोटीहून अधिकची आर्थिक उलाढाल    – पालकमंत्री शंभूराज देसाई

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 जाहीर त्याचे मुद्दे सादर…

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागामार्फत कोकण विभागातीलसर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी मोहीम..

त्या’ बालकांच्या पालकांनी संपर्क करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बंजारा समाजाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा- जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

vishwatmaklokswamivarta

लोककल्याणकारी कामांतून जनतेचे प्रश्न सोडवा- पालकमंत्री शंभूराज देसाई