vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 27 जानेवारीला ग्रंथप्रदर्शनी

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 27 जानेवारीला ग्रंथप्रदर्शनी

बुलडाणा, प्रतिनिधी : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे याकरीता मराठी भाषा विभागाच्या धोरणानुसार दरवर्षी दि. 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. पंधरवडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे दि. 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनीसोबतच स्थानिक पुस्तक विक्रेते, प्रकाशक यांचेकडून बुक स्टॉल लावण्यात येणार असून त्यामुळे वाचकांना आपल्या आवडत्या ग्रंथांची खरेदी करता येणार आहे. या ग्रंथ प्रदर्शनीला जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच ग्रंथप्रेमी व वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल पाटील यांनी केले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ६ महसुली विभागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अकोला येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा तीव्र होत असून, तो उद्या ‘मोंथा’ चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागानुसार, हे चक्रीवादळ मंगळवारी संध्याकाळी किंवा रात्री आंध्र प्रदेशातील काकीनाडाजवळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता….

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर महापर्यटन उत्सव 2025विविध विभागांनी समन्वयातून तयारी करावी-जिल्हाधिकारी संतोष पाटील 

जालना शहरातील चार परीक्षा केंद्रांभोवती 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू- 31 मे रोजी परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू 

जमीन महसूल वसुलीसह फेरफार प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया-विविध विकासकामांची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta