vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

बुलडाणा, प्रतिनिधी: माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत 166 केंद्रावर होणार आहे. ही परीक्षा शांत व सुरक्षित वातावरणात पार पाडावी यासाठी सर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटल्यानुसार परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहीता-2023 चे कलम 163 अन्वये जिल्हयामधील 116 केंद्रावर दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 रोजी सकाळी 6 ते सायं 8 वाजेपर्यंत परिक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून असलेल्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहे.

अटी व शर्ती : परिक्षा केंद्राचे परिसरामध्ये प्रवेश करतेवेळी 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रीतरीत्या प्रवेश करणार नाहीत तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणेबाबत मज्जाव करण्यात येत आहे. परिक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाही. परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मधीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी बुध ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परिक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात यावेत. परिक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट,मोबाईल फोन,सेल्युलर फोन,ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई राहील.परिक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. परिक्षा केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परिक्षार्थी तसेच परिक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना सदर प्रतिबंधात्मक आदेश परिक्षासंबंधी कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला होणारØ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 ऑक्टोबरपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील दिवाळी शिवकालीन वारसा, कोकणी परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव…

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री यांची एकाच दिवशी तीन महाराजस्व शिबिरांना उपस्थिती नागरिकांपर्यंत पोहोचून सेवा देण्यासाठी उपक्रम- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला

vishwatmaklokswamivarta

सोलापूरच्या समान पाणी वितरणासाठी आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रीय सन्मान हा प्रत्येक देशभक्ताची भावना त्यांना भारतरत्न ने सन्मानित करण्याबाबतचा शासकीय ठराव पावसाळी अधिवेशनात पारित करावाआमदार सुधीर मुनगंटीवार यांची राज्य शासनाकडे मागणी