vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 30 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन   

जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 30 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी फुटबॉल खेळाची शालेय विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी प्रथमच जिल्हास्तरीय युथ फुटबॉल लिग स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळा व फुटबॉल क्लबमधील 16 वर्ष वयोगटातील खेळाडूंनी 30 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर यांनी केले आहे.

फुटबॉल या खेळाचा प्रचार व प्रसार समाजातील प्रत्येक खेळाडूंपर्यंत व्हावा यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा फुटबॉल संघटना बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युथ फुटबॉल लिग सन 2024-25 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हातील सर्व शाळेतील 16 वर्ष वयोगटातील खेळाडुंना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील विविध शाळेतील संघाची नोंदणी जिल्हा क्रीडा कार्यालय बुलढाणा येथे ऑफलाईन विनामूल्य नोंदणी करून संघाची यादी दि. 30फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्यालयात जमा करून प्रवेश निश्चित करावा. सदर स्पर्धेसाठी खेळाडुंची वयोमर्यादा 1 जानेवारी 2009 नंतरचा जन्म झालेला खेळाडु स्पर्धेकरीता पात्र राहील. स्पर्धेची तारीख नंतर कळविण्यात येईल.

फुटबॉल युथ लिग स्पर्धेसंदर्भातील अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे किंवा एन.आर.वानखडे (9960434487), डॉ. जे. डब्ल्यु मोहोड(9405734403), मुकेश बाफणा (9422881105), एस.एस.केळे(9423446516) यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाव्दारे कळविण्यात आली आहे.000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी जालन्याचे १५ कराटेपटू दिल्लीला रवाना; सेन्साई रूपेंद्र पारचा यांच्याकडे महाराष्ट्र संघाचे टीम मॅनेजरपद तालकटोरा इंटरनॅशनल स्टेडियमवर २३ व २४ जुलैला होणार राष्ट्रीय स्पर्धा; जालन्याच्या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा…

समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय यशाकडे टप्पा*कॅरम व कुस्ती स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे वर्चस्व…

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय ज्युनीयर टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेकरीता निवड चाचणीचे आयोजन

सरस्वती भुवन प्रशालामध्ये राज्य़ क्रीडा दिनाचे उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने #कबड्डी मध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले

vishwatmaklokswamivarta

क्रीडा महोत्सवात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग-सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

vishwatmaklokswamivarta