vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राज्यस्तरीय ज्युनीयर टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेकरीता निवड चाचणीचे आयोजन

राज्यस्तरीय ज्युनीयर टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेकरीता निवड चाचणीचे आयोजन

जालना/प्रतिनीधी – टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व लातुर जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसीएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 4 ते 6 जुन 2026 दरम्यान उदगीर जि. लातुर येथे होणार्‍या ज्युनीयर 19 वर्षाआतील मुले व मुलीच्यां राज्यस्तरीय ज्युनीयर टेनीस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जालना जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसीएशनच्या वतीने दिनांक 27 मे 2026 बुधवार रोजी एस.व्हि. ईग्लिंश स्कुल, कॉलेज रोड, पेन्शनपुरा जालना येथे सकाळी 9 वाजल्यापासुन निवड चाचणीचे आयोजन करण्यात आलेले आहे. निवड चाचणीमधुन जालना शहर व जालना ग्रामीण असे दोन संघ प्रत्येकी 14 मुले व 14 मुलींची निवड करण्यात येणार आहे.

निवड चाचणीमध्ये सहभागी होण्याकरीता केाणतेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नसुन खेळाडुचे वय 19 वर्षाच्या आत व जन्मतारीख 30/06/2007 च्या नंतरची असणे आवश्यक आहे. टेनिस बॉल क्रिकेट हा खेळ शालेय खेळांमध्ये समाविष्ट असुन दहावी व बारावीच्या खेळाडुंना ग्रेस मार्क साठी पात्र आहे. अधिक माहीतीसाठी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अमजत पठाण किंवा शेख चाँद पी.जे. मो.नं.9822456366 व जयकुमार वाहुळे, नितीन जाधव, यांच्याशी संपर्क साधावा.

तरी निवड चाचणीमध्ये जास्तीत जास्त खेळाडुंनी सहभागी व्हावे असे आवाहन जालना जिल्हा टेनीस बॉल क्रिकेट असोसिएशन, जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन जालना, जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

-शेख चाँद पी.जे.मो.नं. 9822456366

संबंधित पोस्ट

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”**महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न*

vishwatmaklokswamivarta

क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांना सूचना देण्याचे आवाहन

26 एप्रिलला नवी मुंबईत आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोम यांची उपस्थिती*

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य; अकोला जिल्ह्यातील ४३ खेळाडूंना शिष्यवृत्ती, २१ बॉक्सिंगपटूंची चमक

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना जलतरण क्रीडा प्रकारात प्रगत प्रशिक्षण