vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पाण्याचा काटकसरीने वापर करा-पैठण उपविभागीय अधिकारी यांचे आवाहन

पाण्याचा काटकसरीने वापर करा-पैठण उपविभागीय अधिकारी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता, आगामी काळात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता पुरेशी रहावी, यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन पैठण-फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी केले आहे.

याबाबत त्यांनी आवाहन केले आहे की,नागरिकांनी दैनंदिन वापरात पाण्याची बचत करावी, नळ सुरू ठेवणे व पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा. घरगुती व सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्थेत गळती आढळल्यास संबंधित ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला त्वरित कळवावे. बागकाम, परिसर स्वच्छता आदी कामांसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर टाळून शक्य तेथे पाण्याचा पुनर्वापर करावा. तलाव, विहिरी व अन्य पारंपरिक जलस्रोतांचे संरक्षण करून त्यांचे प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

प्रमुख जलाशयांतील उपलब्ध जिवंत पाणीसाठ्यापैकी किमान १० टक्के साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. हा साठा केवळ अत्यावश्यक परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी वापरता येईल. सर्वसाधारण वापरासाठी त्याचा विनियोग करता येणार नाही.

धरणे, कालवे, नद्या, तलाव व सार्वजनिक जलस्रोतांमधून अनधिकृत पाणी उपसा करू नये. अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाची संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. अनधिकृत पाणी उपसा करताना आढळल्यास विद्युत पंप, पाइपलाइन व अन्य साहित्य जप्त करण्यासह प्रचलित कायदे व नियमांनुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ही त्यांनी दिला आहे.शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून सिंचनाचे नियोजन करावे. ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करावा तसेच कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घ्यावा.

पाणी बचत ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पैठण व फुलंब्री तालुक्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, औद्योगिक घटक, ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

गणेशोत्सव राज्य महोत्सवासाठी व्यापक कृती आराखडा तयार करा- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ३८ हजार ३९० शेतकऱ्यांची ४१ हजार ४२१ कर्ज खाती पोर्टलवर अपलोड, ॲग्रीस्टॅक नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी-जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती; समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार

vishwatmaklokswamivarta

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

माण, खटाव व फलटण तालुक्यात ३९ टँकरने पाणीपुरवठा

vishwatmaklokswamivarta

छत्रपतीसंभाजीनगर | पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!

vishwatmaklokswamivarta