vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यामध्ये चामडयाच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती कार्यरत असून, त्यांची उपजिविका ही चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्तीच्या क्षेत्रावर अवलंबून आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायिक हे रस्त्याच्या कडेला उन्हातान्हात बसून आपली सेवा जनतेला देत असतात, या व्यावसायिकांना ऊन, वारा व पाऊस यांपासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी गटई कामगारांना 100 टक्के अनुदान या तत्वावर पत्र्याचे स्टॉल वर कमाल रु. 5000/- इतके अनुदान देणे ही योजना राबविण्यात येते. तरी या योजनेचा जास्तीत जास्त गटई कामगारांनी लाभ घ्यावा.

विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयात सादर करावे. सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी उद्या ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा

तेरा वर्षीय धैर्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी; धैर्या बनली साताऱ्याच्या अभिमान!

मुंबईतील अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसएबिलिटीज च्या 42 व्या वार्षिक समारंभात शैक्षणिक आणि सांस्कृतिक उत्कृष्टतेचा उत्सव साजरा

छत्रपती संभाजीनगरात रविवारी भिक्खू करूणानंद थेरो यांचा ऐतिहासिक महाथेरो समारंभ व कठीण चिवरदान धम्मसोहळा

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते 61,125 कोटी रु जिल्हा पतपुरवठा पुस्तिकेचे अनावरण- पीक कर्जाची मार्चअखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा–जिल्हाधिकारी किशन जावळे