vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उदयोजक मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उदयोजक मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी :- स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नव उदयोजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत योजना सुरु करण्यात आली आहे.या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउदयोजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येते.

सदर योजनेचा लाभ अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नव उदयोजकांनी घ्यावा असे आवाहन श्री. सुनिल जाधव, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी केले आहे. संपर्कासाठी पत्ता सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा.

 

0000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी* 

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून फुलंब्री धरण परिसरातील  नुकसानग्रस्त भागाची पाहणी मच्छीमार बांधवांशी साधला संवाद..

जंगल आग प्रकरणी वनविभागाची कारवाई; दोन आरोपी ताब्यात…

मुंबई सह उपनगरात आणि राज्यात रायगड जिल्ह्यात   जोरदार पाऊस …

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा-महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

उष्णतेच्या लाटेच्या प्रतिसादासाठी मार्गदर्शक सूचनांची कोटेकोर अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील