vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

महाकुंभपर्वातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला ७५ हजारांहून अधिक भाविकांनी दिली भेट..* अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ देशांतील भाविकांनी दिली भेट !* आचारधर्मावर आधारित ग्रंथांकडे भाविकांचा कल !

महाकुंभपर्वातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला ७५ हजारांहून अधिक भाविकांनी दिली भेट..* अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ देशांतील भाविकांनी दिली भेट !* आचारधर्मावर आधारित ग्रंथांकडे भाविकांचा कल !

 

 उत्तर प्रदेश प्रतिनिधी    प्रयागराज – महाकुंभक्षेत्री सेक्टर क्र. १९ मधील मोरी-मुक्ती मार्ग चौक येथे लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि फलक प्रदर्शनाला साधू-संत, भाविक, तसेच मान्यवर यांच्याकडून उत्सर्फूत प्रतिसाद लाभला. १० जानेवारी ते १२ फेबु्रवारी या कालावधीत या ग्रंथप्रदर्शनाला एकूण ७५ हजारांहून भाविकांनी भेट दिली. यामध्ये भारतातील अनेक राज्यांसह अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ आदी देशांतील भाविकांचा समावेश आहे.

    या प्रदर्शनात अध्यात्म, आयुर्वेद, बालसंस्कार, धर्मशास्त्र, आपत्काळ आदी विषयांवरील ग्रंथ बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, तामिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या सर्व ग्रंथांमध्ये प्रामुख्याने आचारधर्मावर आधारित ग्रंथांकडे (उदा. देवळात दर्शन कसे घ्यावे ?’, ‘प्रदक्षिणा कशा घालाव्यात ?’ इ.) भाविकांचा सर्वाधिक कल असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे सनातनच्या सर्व भाषांतील ग्रंथांपैकी बंगाली भाषेतील ग्रंथांना सर्वाधिक मागणी आहे. या प्रदर्शस्थळी लावण्यात आलेल्या फलक प्रदर्शनालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये या सर्व फलकांची छायाचित्रे काढून घेतली.

  यासह सनातनच्या वतीने ई-रिक्शा, फिरते ग्रंथप्रदर्शन, म्हणजेच ‘मोबाईल स्टॉल’ आदी माध्यमांतूनही ११ हजारांहून अधिक जिज्ञासूंनी सनातनच्या ग्रंथांचा लाभ घेतला.   अनेक जिज्ञासूंनी त्यांच्या राज्यांमध्ये सनातनच्या ग्रंथ वितरणासाठी जागा उपलब्ध करून देऊन सनातनच्या कार्यात सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

संबंधित पोस्ट

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

भारत – पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक- राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा

राज्यात पुढील 5 दिवस पूर्व मान्सून पाऊस कोसळणार! अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी….

जग विक्रम’ जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास;एलपीजी (LPG) कार्गो घेऊन १५ एप्रिलला मुंबईत पोहोचणार! 🇮🇳

महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय-मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळतील  .