vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील हजारो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना दिली भेट !

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार !मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील हजारो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना दिली भेट !

 

 मुंबई – प्रतिनिधी- प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. या सर्व ग्रंथप्रदर्शनांना हजारो जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे विविधांगी ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने घेतली.

   ‘महाशिवरात्री’ला शिवतत्त्व नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असते. या दिवशी शिवाची उपासना जेवढी अधिक करू, तेवढा उपासकाला आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. या अनुषंगाने शिवाच्या उपासनेसह विविध विषयांवर भाविकांना शास्त्रीय माहिती या ग्रंथप्रदर्शनांवर देण्यात आली. या सर्व ग्रंथप्रदर्शनांना भेट देणारे विविध मान्यवर जिज्ञासू आणि भाविक यांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळविषयीची सिद्धता आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथ आणि सात्विक उत्पादने यांचा लाभ घेतला. महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच शिवाच्या उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे यासाठी फलक प्रसिध्दी, सोशल मिडीया आदी माध्यमातूनही सनातन संस्थेच्या वतीने लोकांचे प्रबोधन करण्यात आले.सौ. धनश्री केळशीकर सनातन संस्थेकरिता संपर्क क्र. 8104683907

संबंधित पोस्ट

शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमातून आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाला उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तीबाधित शेतकऱ्यांसाठी 121 कोटींच्या मदत निधीस मंजूरी- आतापर्यंत 219 कोटी 70 लाख रुपयांची मदत- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

मोघरपाडा कारशेड जागेसंदर्भात आगरी/ कोळी बांधवाच्या विकासाच्या दृष्टीने कुणावरही अन्याय होणार नाही   – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची  राज्य सरकारची तयारी- उपमुख्यमंत्री अजित पवार

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ -उभाटा आणि मनसे यांचा | मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर..

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :ड्रग्ज प्रकरणात दोषी पोलिसांना बडतर्फ करणार- गृह राज्यमंत्री योगेश कदम