vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती संभाजीनगर पोलिसांना नवीन ३३ वाहनांचा ताफा; गुन्हेगारी नियंत्रणासाठी मोठे बळ पोलीस दल अधिक बळकट करण्यावर भर -पालकमंत्री शिरसाट

छत्रपती संभाजीनगर पोलिसांना नवीन ३३ वाहनांचा ताफा; गुन्हेगारी नियंत्रणासाठी मोठे बळ पोलीस दल अधिक बळकट करण्यावर भर -पालकमंत्री शिरसाट

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि पोलिसांना अत्याधुनिक साधन-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ५ कोटी रुपयांच्या निधीतून ३३ नव्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. अत्याधुनिक सुविधा, साधने उपलब्ध करून पोलीस दल अधिक सक्षम व बळकट करण्यावर शासनाचा भर असल्याचे यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी जाहीर केले.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्याला खासदार डॉ. कल्याण काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. वीरेंद्र राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, राजेंद्र जंजाळ, नंदकुमार घोडेले आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी पोलिसांना सक्षम बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. गुन्हेगारीच्या निर्मूलनासाठी आणि शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना आवश्यक ती साधने पुरवली जातील. पोलिसांनी जबाबदारीने काम करावे आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा,असे सांगितले.

पोलीस दलाला नवीन ३३ वाहने,पोलीस अधीक्षक कार्यालय: १० वाहने,पोलीस आयुक्त कार्यालय: १५ वाहने

राज्य राखीव पोलीस दल: ८ वाहने (यात एका बसचा समावेश)यावेळी पोलिसांसाठी अँम्ब्युलन्स देण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला. पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी शासन त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील, असेही मंत्री शिरसाट यांनी सांगितले. “आगामी काळात आणखी ३० वाहने पोलिसांना देण्यात येणार आहेत,” असेही त्यांनी जाहीर केले.पोलीस दलाच्या या आधुनिकीकरणामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, तसेच गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.खा. डॉ. कल्याण काळे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून नवीन वाहने पोलीस दलात समाविष्ट करण्यात आली.

संबंधित पोस्ट

सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी विविध यंत्रणांची संयुक्त रंगीत तालीम• लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण..

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान वारशाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहूया.राष्ट्रीय सलोखा, सामर्थ्य आणि एकता याबद्दलची आपली बांधिलकी पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा.

vishwatmaklokswamivarta

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे आयोजन….

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद लक्षवेधी :प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्यांवर कोणताही अन्याय होणार नाही- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 रील शूट करताना धडक, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 

प्रेरणा विद्यालय मतिमंद मुलांची निवासी शाळेचाअनुदान प्रस्ताव ऑक्टोबरपर्यंत पाठवा- दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे