vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोताळा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिलला सोडत..

मोताळा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिलला सोडत..

 

बुलडाणा, प्रतिनिधी: ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार मोताळा तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान मोताळा तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण दि. 16 एप्रिल 2025 रोजी तहसिल कार्यालय, मोताळा येथे निश्चित करणार आहे.

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गा अंतर्गत स्त्रीकरीता आरक्षण सोडत दि. 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता सूरु होणार असून उपविभाग मलकापुर अंतर्गत मोताळा तालुक्याचे स्त्रीकरीता आरक्षण सोडत दुपारी 2.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे निश्चीत करण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडतीकरीता मोताळा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मोताळा तहसिलदार हेंमत पाटील यांनी कळविले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा  –जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी (दि.२६) विभागात…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत 436 कोटी नियतव्यय मंजूर

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री

.आज नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.

vishwatmaklokswamivarta

मेळघाट आरोग्य परिक्रमेत डॉक्टरांनी सक्रीय सहभाग नोंदवावा -जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta