vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या !  कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य 

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या !  कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य

 

         बुलढाणा, प्रतिनिधी: केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी 15 एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवून घेतले नाही त्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करुन शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बनवून कृषी योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

फार्मर आयडी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) तयार करण्यात येणार असून उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरीत करणे सुलभ होईल. तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही. शेतकरी ओळख पत्र क्रमांक 15 एप्रिल 2025 अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचे शासननिर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी सातबारा आधारला लिंक करायचा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 47 हजार 213 शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी तयार करुन वितरीत करण्यात आले आहे.

आयडी बनवण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक जो आधार व बँक खात्याशी लिंक व सातबारा किंवा नमुना 8 या कागदपत्राची आवश्यक आहे. ही कागदपत्रे घेवून आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्र (सीएससी), ग्राम कृषि विकास समिती येथे नोंदणी करावी. फार्मर आयडी बनवला नाही तर कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक बनवून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

आपत्कालीन स्थितीबाबत सर्वंकष आढावा-रक्तदात्यांनी पुढे यावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक

vishwatmaklokswamivarta

नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच ‘आफ्रिकन सफारी’ चा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गोरेवाडा झू लिमिटेड आणि एनबीसीसीमध्ये सामंजस्य करार

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले पाऊल …प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले समाधी स्थळी अभिवादन*