vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्यास्थानिक बातम्या

आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

‘आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

 

       नवी मुंबई प्रतिनिधी- यावर्षी मार्च महिन्यापासूनच राज्यातील अनेक भागात तापमान वाढले असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘हिट वेव्ह’ किंवा ‘उष्णतेची लाट’ ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे.

साधारणत: एखादया प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान 3 डिग्री सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवसांसाठी 45 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असेल तर त्याला ‘उष्णतेची लाट’ असे संबोधतात. उष्णतेच्या लाटेमुळे माणसांसोबतच पक्षी, प्राणी, वनस्पती यांची होणारी हानी मोठी आहे. साधारणपणे मार्च ते जून या मान्सून पूर्वकाळात या उष्णतेच्या लाटा येताना दिसतात,

  या उष्णतेच्या लाटेचा अपाय आपल्याला होऊ नये यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकानेच काळजी घेणे जरुरीचे असून यादृष्टीने नवी मुंबईकर नागरिकांनी खबरदारीचा भाग म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टींचे व नियमांचे पालन करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये –

नियम १ : पुरेसे पाणी प्यावे. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्यावेत. प्रवास करताना पिण्याचे पाणी आवर्जून सोबत ठेवावे.

नियम २ : पांढरे, सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी घालावी.

नियम ३ : आपली बाहेरील कामे सकाळी 10 च्या आत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावीत.

नियम ४ : टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्ष, अननस, काकडी , कोशिंबीर इ. पाण्याचे जास्त प्रमाण असलेली हंगामी फळे व भाज्या खाव्यात.

नियम ५ : उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत.

नियम ६ : दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे.

नियम ७ : दुपारी 2 ते 4 या वेळात स्वयंपाक करणे टाळावे.

नियम 8 : चप्पल न घालता / अनवाणी उन्हात चालणे टाळावे.

नियम 9 : लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना वाहनात आत ठेवून गाडी बंद करणे टाळावे.

नियम 10: सामूहिक मेळावे/ क्रीडा विषयक कार्यक्रम या दरम्यान पिण्याच्या पाण्याची सोय असेल, थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क नसेल याची खबरदारी घ्यावी.

    नवी मुंबईकर नागरिकांनी उन्हाळ्याच्या कालावधीत वरील नियमांचे पालन करावे आणि उष्माघात टाळावा तसेच उष्माघात संदर्भात लक्षणे आढळून आल्यास त्वरित आपल्या घराजवळील नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयातून उपचार घ्यावेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्याऱ्या भारत गौरव पर्यटन रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून हिरवा झेंडा दाखवला. 

नव्या मुंबईत 23 ते 25 मार्च रोजी नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन 

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना अभिवादन*

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्याकामकाजाचा विभागीय आयुक्तांकडून आढावा..

मुंबई पोलिसांचे कौतुकास्पद पाऊल, चोरीला गेलेली आणि हरवलेली ८९.७९ लाख रुपये नागरिकांना परत करण्यात आले

vishwatmaklokswamivarta