vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अंबाला येथील अन्नातून विषबाधा; रुग्णांवर उपचार सुरु

अंबाला येथील अन्नातून विषबाधा; रुग्णांवर उपचार सुरु

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- अंबाला ता. कन्नड येथे सामुदायिक विवाह सोहळ्यातील जेवणावळीत अन्नातून विषबाधा झाल्याने २५५ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील एका ८ वर्षीय बालकाचा रुग्णालयात येण्याआधीच मृत्यू झाला होता. उर्वरितांपैकी ८१ जणांना उपचाराअंती सुटी देण्यात आली असून उर्वरितांवर उपचार सुरु आहेत,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले आहे.

अंबाला ता. कन्नड येथे दि.२५ रोजी सामुदायिक विवाह सोहळ्यात ८ जोडप्यांचे विवाह झाले. या सोहळ्यास २७०० ते ३००० लोक सहभागी होते. या लोकांनी या विवाहसोहळ्यातील जेवणावळीत जेवण केले. त्यानंतर त्यांना अन्न विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. या पैकी काही लोकांना जुलाब, उलटी सारखे त्रास सुरु झाले. यातील २५५ रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेडा, वडनेर, औराळा व ग्रामिण रुग्णालय कन्नड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी ७१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. १५७ रुग्ण भरती आहेत. २७ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. ८१ रुग्णांवर उपचार झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. या घटनेत सुरेश गुलाब मधे (८ वर्षे) रा. महादू खोरा या बालकाचा प्रा.आ.केंद्र करंजखेड येथे उपचारासाठी आणत असतांना उपचाराआधीच मृत्यू झाला. याच घटनेतील ३० रुग्ण हे प्राथमिक आरोग्य केंद्र बोलठाण ता. नांदगाव जि. नाशिक येथे तपासणी साठी गेले होते. या रुग्णांवर तेथेच उपचार सुरु असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना तेथेच निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दाखल असलेल्या सर्व बाधीत रुग्णांवर करंखेडा, वडनेर, औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकामार्फत गावांमध्ये सर्व्हेक्षण, जनजागृती करण्यात येत असून उपचार व नियंत्रणात्मक कारवाई करण्यात येत आहे,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जालना येथे धनगर समाजाचा भव्य आरक्षण मोर्चा संपन्न

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याकांसाठीच्या योजनांचा पात्र गरजूंना लाभ द्यावा- अध्यक्ष प्यारे जिया खान

कारगिल विजय दिवसाच्या 26 व्या स्मरण दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि संजय सेठ यांच्या उपस्थितीत ‘कारगिल विजय दिवस पदयात्रेचे आयोजन

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडूनशहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील तिसरे दिव्याशा केंद्र बुलढाण्यात;दिव्याशा केंद्र दिव्यांगासाठी पर्वणी – ना. प्रतापराव जाधव• केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण• 47 दिव्यांगांना 3 लाख 51 हजारांचे साहित्य वाटप

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांच्या जीवनात विकासरूपी सप्तरंगांची उधळण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह साजरी केली धुळवड