vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळस्थानिक बातम्या

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीनेविविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीनेविविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे

मुंबई प्रतिनिधी : मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते ९ मे २०२५ या कालावधीत विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमामध्ये हैंडबॉल, बास्केटबॉल, वुशू, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग आणि फुटबॉल या खेळांचा समावेश आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन मुंबई उपनगराच्या जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.

प्रशिक्षण स्थळे आणि वेळा पुढीलप्रमाणे :

बास्केटबॉल: जिकेपी बास्केटबॉल कोर्ट, आचार्य अत्रे मैदान, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथे सायंकाळी ४.४५ ते ६.००

हँडबॉल: विभागीय क्रीडा संकुल, चिकूवाडी, मुंबई पब्लिक स्कूलसमोर, सायंकाळी ४ ते ६

फुटबॉल: होली पब्लिक स्कूल, अंधेरी येथे सायंकाळी ४ ते ६

पॉवरलिफ्टिंग व वेटलिफ्टिंग: फिटनेस पॉईंट जिम, भांडूप पश्चिम येथे दुपारी ३ ते ६

वुशू: श्री नारायण गुरु हायस्कूल, चेंबूर व एस.आय.इ.एस., घाटकोपर येथे दुपारी १२.३० ते १.३०

शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर, भक्ती आंब्रे, क्रीडा कार्यकारी अधिकारी प्रीती टेमघरे व शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मनिषा गारगोटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मनीषा गारगोटे – ८२०८३७२०३४, श्रीमती प्रीती टेमघरे – ९०२९०५०२६८ यांना संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीचा इशारा : नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध-

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षे साठी पात्र उमेदवारांना पूर्व तयारी करण्याचे आवाहन

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा सोमनाथ स्वाभिमान पर्व – अतूट आस्थेचे १००० वर्षी” या विशेष  कार्यक्रमाचे आयोजन

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर…

चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta